Headlines

विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी सप्टेंबर अखेरपर्यंत जात पडताळणीचे ऑनलाईन फॉर्म भरावे – डॉ. ज्योत्स्ना पडियार

⚡मालवण ता.१५-: बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी सप्टेंबर महिन्याच्या अखरेपर्यंत जात पडताळणीचे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावेत व आक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जात पडताळणीचे ऑफलाईन प्रस्ताव जात पडताळणी समिती सिंधुदुर्ग येथे सादर करावेत, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी निवडश्रेणी तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सिंधुदुर्ग अध्यक्ष डॉ. ज्योत्स्ना पडीयार यांनी मालवण शहरातील टोपीवाला ज्युनियर कॉलेज व भंडारी…

Read More

यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘अभियंता दिन’ उत्साहात साजरा….

⚡सावंतवाडी ता.१५-: येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये भारतरत्न डॉ.एम.विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणारा अभियंता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वेंगुर्ले नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी परितोष कंकाळ उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व डॉ.विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष…

Read More

बांदा तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी संदेश पावसकर यांची निवड…

⚡बांदा ता.१५-: बांदा गावच्या ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी येथील व्यापारी संदेश पावसकर यांची एकमताने निवड करण्यात आली. तर पत्रकार प्रतिनिधी म्हणून ‘सकाळ’चे बातमीदार निलेश मोरजकर यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गुरुनाथ सावंत यांच्या हस्ते संदेश पावसकर यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बांदा सरपंच प्रियांका नाईक,…

Read More

शहरातील उर्वरित कुत्र्यांची देखील नसबंदी करावी…

राजू मसुरकर: धूम स्टाईल बाबत मुंबई नगर विकास मंत्रालयाकडून आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करा… ⚡सावंतवाडी ता.१५-: गेल्यावर्षी सावंतवाडी नगरपालिकेने 500 भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली होती अजून दोन हजार ते अडीच हजार पर्यंत भटके कुत्रे शहरामध्ये नागरिकांना व वृद्ध व शालेय मुलांना जीव मुठीत धरून दैनंदिन कामासाठी घराच्या बाहेर पडावे लागते यासाठी नगरपालिकेने तातडीने भटक्या कुत्र्यांची नसबंदी…

Read More

कोकण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा…

_कम्युनिटी डेव्हलपमेंट अवॉर्ड या राष्ट्रीय पुरस्काराने बेंगलोर येथे झाला सन्मान .. ⚡बांदा ता.१५-: कोकण कला व शिक्षण विकास संस्था सामाजिक बदल घडवण्यासाठी कार्यरत असून शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, महिला सक्षमीकरण आणि बालविकास केंद्र अशा अनेक विषयावर काम करते, त्याचबरोबर रस्त्यावरील मुलांसाठी गल्ली स्कुल, आदिवासी मुलांसाठी युवा किरण, महिलांसाठी पॅड यात्रा आणि लाईवलीहूड जनरेशन शिलाई स्कुल, गावातील…

Read More

निवडले गेले आहात त्या पदाला न्याय द्या…

आमदार नितेश राणे:कोतवाल पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप ⚡कणकवली ता.१५-: प्रत्येक उमेदवाराने आपली बुध्दिमत्ता सिद्ध करून कोतवाल पद मिळवले आहे.आपण ज्या खुर्चीवर बसणार ती खुर्ची जनसेवेसाठी आहे हे लक्षात ठेवा.कोणताही स्वार्थ नको. तुमचा वेळ आणि मेहनत ही जनतेसाठी,देशासाठी आहे हे लक्षात ठेवा.आपल्याकडून जनतेच्या फार अपेक्षा आहेत.आपण ज्या पदावर निवडले गेले आहात त्याला न्याय…

Read More

अपर जिल्हाधिकारी म्हणून रवी पाटील यांनी स्वीकारला पदभार

ओरोस ता.१५-:सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवीन अपर जिल्हाधिकारी म्हणून रवी पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. शंकर बर्गे यांची रत्नागिरी जिल्ह्यात बदली झाल्याने त्यांच्या जाग्यावर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील यापूर्वी कोकण आयुक्त कार्यालयात पुरवठा विभागात कार्यरत होते.

Read More

मालवण तालुकास्तरीय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत भंडारी ए सो कनिष्ठ महाविद्यालय विजयी

⚡मालवण ता.१५-: मालवण तालुकास्तरावरील मुलींच्या १९ वर्षाखालील कबड्डी स्पर्धेत मालवण येथील भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने विजेतेपद पटकविले. या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने पहिल्या सामन्यात मालवणच्या टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघावर २५ गुणांनी एकतर्फी विजय मिळविला. तर दुसऱ्या अटीतटीच्या सामन्यात मालवणच्या स. का. पाटील सिंधुदुर्ग…

Read More

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात हिंदी सप्ताह साजरा

⚡मालवण ता.१५-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या हिंदी विभागामार्फत हिंदी दिनाचे औचित्य साधून हिंदी भाषेच्या प्रसार व प्रचारा साठी ‘हिंदी सप्ताह’ साजरा करण्यात आला. यामध्ये हिंदी पुस्तक प्रदर्शन, हिंदी निबंध स्पर्धा व हिंदी काव्य पाठ स्पर्धा आदी कार्यक्रम पार पडले. हिंदी दिना निमित्त महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हिंदी कविता…

Read More

गोगटे वाळके कॉलेजमध्ये चंद्रकला करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

⚡बांदा ता.१५-: येथील गोगटे वाळके कॉलेजमध्ये श्रीमती चंद्राबाई कल्लाप्पा म्हेत्री मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट हलकर्णी, गडहिंग्लज आणि शिक्षण प्रसारक मंडळ बांदा संचलित गोगटे वाळके कॉलेज बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने 7 ऑक्टोबर 2023 रोजी आंतर महाविद्यालयीन गट व शालेय माध्यमिक गट अशा दोन गटात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती म्हेत्री ट्रस्टचे अध्यक्ष प्रा….

Read More
You cannot copy content of this page