बांदा तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी संदेश पावसकर यांची निवड…

⚡बांदा ता.१५-: बांदा गावच्या ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी येथील व्यापारी संदेश पावसकर यांची एकमताने निवड करण्यात आली. तर पत्रकार प्रतिनिधी म्हणून ‘सकाळ’चे बातमीदार निलेश मोरजकर यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गुरुनाथ सावंत यांच्या हस्ते संदेश पावसकर यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी बांदा सरपंच प्रियांका नाईक, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष अन्वर खान, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, सौ. रुपाली शिरसाट, राजाराम उर्फ बाळू सावंत, रत्नाकर आगलावे, आबा धारगळकर, देवल येडवे, शामसुंदर मांजरेकर, रिया येडवे, शिल्पा परब, तनुजा वराडकर, दीपलक्ष्मी पटेकर, शामसुंदर मांजरेकर, प्रशांत बांदेकर, भाऊ वाळके, निखिल मयेकर, ग्रामविस्तार अधिकारी लीला मोर्ये आदिसह शहरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page