मालवण तालुकास्तरीय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत भंडारी ए सो कनिष्ठ महाविद्यालय विजयी

⚡मालवण ता.१५-: मालवण तालुकास्तरावरील मुलींच्या १९ वर्षाखालील कबड्डी स्पर्धेत मालवण येथील भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने विजेतेपद पटकविले. या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या स्पर्धेत भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने पहिल्या सामन्यात मालवणच्या टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघावर २५ गुणांनी एकतर्फी विजय मिळविला. तर दुसऱ्या अटीतटीच्या सामन्यात मालवणच्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या संघावर ६ गुणांनी विजय मिळविला.

भंडारी ए सो कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघातून महिमा तारी, विनिता साठे, रेणुका पाटील, एकता मालवणकर, ईशा शिरोडकर, भक्ती बेलूसे, वेदिका फाटक, साक्षी चव्हाण, सानिका गोलतकर, जरीना खान, छाया यमकर या विद्यार्थिनींचा समावेश होता. दोन्ही सामन्यात भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघातर्फे महिमा तारी हिने उत्कृष्ट चढाई तर विनिता साठे व एकता मालवणकर यांनी उत्कृष्ट पकडीचे दर्शन घडविले. या विद्यार्थिनींना श्री. साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थिनींचे प्राचार्य हणमंत तिवले यांनी अभिनंदन केले. यावेळी प्रा. पवन बांदेकर, प्रा. स्नेहल पराडकर, प्रा. गावडे, प्रा. सावंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page