निवडले गेले आहात त्या पदाला न्याय द्या…

आमदार नितेश राणे:कोतवाल पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप

⚡कणकवली ता.१५-: प्रत्येक उमेदवाराने आपली बुध्दिमत्ता सिद्ध करून कोतवाल पद मिळवले आहे.आपण ज्या खुर्चीवर बसणार ती खुर्ची जनसेवेसाठी आहे हे लक्षात ठेवा.कोणताही स्वार्थ नको. तुमचा वेळ आणि मेहनत ही जनतेसाठी,देशासाठी आहे हे लक्षात ठेवा.आपल्याकडून जनतेच्या फार अपेक्षा आहेत.आपण ज्या पदावर निवडले गेले आहात त्याला न्याय द्या असे आवाहन आम. नितेश राणे यांनी केले.


कणकवली,देवगड,वैभववाडी तालुक्यातील ९ कोतवाल पदाची शासकीय प्रक्रियेप्रमाणे निवड झाली.निवड झालेल्या उमेदवारांना आम. नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये नियुक्तपत्रे देण्यात आली.यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर,कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे, देवगड तहसीलदार आर.जे.पवार, आदीसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
आम.नितेश राणे म्हणाले, शासनाचा पारदर्शक कारभारासाठी आपल्या कर्मचाऱ्यांची सकारात्मक मानसिकता गरजेची आहे. कणकवली विभागाचे काम ज्या पद्धतीने चालू आहे त्याचे खरेच कौतुक केले पाहिजे.अजून काही भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होत आहेत त्याचा सुद्धा फायदा जनतेने घ्यावा असे आवाहन यावेळी आम.नितेश राणे यांनी केले.
प्रांताधिकारी जगदीश कातकर म्हणाले,१४ जागा होत्या मात्र आरक्षणात जे उमेदवार आले त्यातून परीक्षा देवून ९ जन उत्तीर्ण झाले आहेत. शासन स्तरावर अजून तलाठी, पोलीस पाटील पदभरती करत आहे. त्या भरतीचा फायदा सर्वांनी घ्यावा.कणकवली विभागात ९३ पोलीस पाटील पदांच्या भरती होणार आहेत.त्याचाही फायदा घ्यावा.असे आवाहन प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी केले.

You cannot copy content of this page