कोकण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा…

_कम्युनिटी डेव्हलपमेंट अवॉर्ड या राष्ट्रीय पुरस्काराने बेंगलोर येथे झाला सन्मान ..

⚡बांदा ता.१५-: कोकण कला व शिक्षण विकास संस्था सामाजिक बदल घडवण्यासाठी कार्यरत असून शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, महिला सक्षमीकरण आणि बालविकास केंद्र अशा अनेक विषयावर काम करते, त्याचबरोबर रस्त्यावरील मुलांसाठी गल्ली स्कुल, आदिवासी मुलांसाठी युवा किरण, महिलांसाठी पॅड यात्रा आणि लाईवलीहूड जनरेशन शिलाई स्कुल, गावातील स्वच्छ पाण्यासाठी वॉटर एटीम आणि गरजू महिला आणि मुलांसाठी अनेक उपक्रम करत आहे. संस्था गेली ११ वर्षे सातत्याने कार्यरत असून देशातील ४ राज्यांमध्ये संस्थेच्या कामातुन हजारो लाभार्थ्यांना मदत झाली आहे.

गेली अनेक वर्षे केलेल्या कामातून संस्थेचे समाजसाठीचे समर्पण लक्षात घेऊन संस्थेच्या कार्याबद्दल संस्थेला सी.एस.आर वर्ल्ड डे या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या समूहाकडून आज १५ सप्टेंबर रोजी बेंगलोर येथील ताज या पंचतारांकित हॉटेलमध्ये कम्युनिटी डेव्हलपमेंट अवॉर्ड या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आज संपन्न झालेल्या या कार्यक्रमात भारतातील शेकडो संस्थानी हजेरी लावली, एकूण २५ संस्थाना सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल येथे गौरवण्यात आले. याच कार्यक्रमात कॉर्पोरेट क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे स्वरूप असलेला हा पुरस्कार संस्थेच्या वतीने अध्यक्ष दयानंद कुबल, व्यवस्थापक सुरज कदम, प्रकल्प व्यवस्थापक प्रीती पांगे यांनी स्वीकारला.

गेली १० वर्षे सीएसआर वर्ल्ड डे हा समूह सामाजिक क्षेत्रातील प्रेरणादायी काम करणाऱ्या संस्था आणि मान्यवर याना पुरस्कृत करते. १० व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात कोकण कला व शिक्षण विकास संस्थेला मिळालेला पुरस्कार हा संस्थेचे सर्व सहकारी आणि कार्यकर्ते यांच्या मेहनतीचे फळ आहे. पुरस्काराच्या माध्यमातून पाठीवर मिळालेली थाप अजून जोमात काम करण्यास कोकण संस्थेला उत्तेजना मिळेल अशी भावना अध्यक्ष दयानंद कुबल यांनी बोलून दाखवली.

You cannot copy content of this page