Headlines

मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट वाटप…

मुंबई येथील सेवा सहयोग फाऊंडेशनतर्फे राबविण्यात आला उपक्रम… ⚡सावंतवाडी ता.१०सहदेव राऊळ-: दहिसर-मुंबई येथील “सेवा सहयोग फाऊंडेशनतर्फे ” एक चांगला शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला असून या संस्थेमार्फत मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव‌ प्रशालेतील गरीब व गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट वाटप करण्यात आले. यावेळी दहिसर मुंबई येथील सुभेदार रावजी आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक तथासेवा सहयोग फाऊंडेशनचे प्रतिनिधी…

Read More

देवगड येथे पर्यटनासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थींच्या मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दुःख व्यक्त…

⚡सिंधुदुर्ग ता.०९-: “सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड येथे पर्यटनासाठी गेलेल्या पुणे येथील संकल्प सैनिक अकादमीच्या प्रशिक्षणार्थींचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडून या घटनेची माहिती घेण्यात आली असून अन्य प्रशिक्षणार्थींना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मृत्यू पावलेल्या प्रशिक्षणार्थींच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. समुद्र किनारी, डोंगर दऱ्यांमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या सर्वांनी आवश्यक…

Read More

पुणे येथील सहलीसाठी आलेल्या देवगड समुद्रात सहा विद्यार्थी बुडाले…

एकाला वाचवण्यात यश: चार जणांचा मृत्यू; तर एक अद्याप बेपत्ताच.. ⚡देवगड ता.०९-: देवगड पर्यटनासाठी पुणे येथील एक सैनिक अकॅडमीची सहल आली असताना या सहलीमधील विद्याथ्र्यांना समुद्रस्नानाचा आनंद लुटण्याचा मोह आवरला नाही.हे विद्यार्थी पाण्यात उतरून आनंद घेत असतानाच पाण्याचा अंदाज न आल्याने यातील सहाही जण बुडाले.यापैकी एकाला वाचविण्यात यश आले असून एकजण बेपत्ता आहे तर चारजणांचा…

Read More

पणदूर सातेरी मातेचा उद्या जत्रोत्सव

⚡कुडाळ ता.०९-: नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी अशी ख्याती असलेल्या पणदूर गावची ग्रामदेवता ‘श्री देवी सातेरी मातेचा’ वार्षिक जत्रोत्सव उद्या, कार्तिक कृष्ण द्वादशी म्हणजेच रविवार दि. १० डिसेंबर २०२३ रोजी भक्तीमय वातावरणात साजरा होणार आहे.यावेळी सकाळपासून ओटी भरणे, नवस पूर्ण करणे, त्यानंतर रात्रौ आजगावकर दशावतार मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे. भक्तांनी श्री देवी सातेरी…

Read More

मदर क्विन्स् इंग्लिश स्कुलचे ‘रंगोत्सव सेलिब्रेशन’ स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर नेत्रदिपक यश…

⚡सावंतवाडी ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्विन्स् इंग्लिश स्कुल सावंतवाडी च्या विदयार्थ्यांनी ‘रंगोत्सव सेलिब्रेशन नॅशनल लेवल आर्ट’ स्पर्धेमध्ये नेत्रदिपक यश संपादित केले. रंगोत्सव सेलिब्रेशन तर्फे कलरिंग, कोलाज मेकिंग, स्केचिंग, हॅन्डरायटिंग, टॅटू मेकिंग, फोटोग्राफी, फिंगर अॅन्ड थम पेंटींग, ग्रिटींग कार्ड, कार्टून मेकिंग इ. स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये नर्सरी ते दहावी पर्यतचे ९०…

Read More

सामंत ट्रस्ट तर्फे गरजू व्यक्तींना धनादेश प्रदान…

⚡सावंतवाडी ता.०९-: मुंबई येथील सामंत ट्रस्ट तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल रुग्णांच्या नातेवाइकांना आज सावंतवाडी येथील डॉ परूळेकर नर्सिंग होम येथे प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. असनिये, सावंतवाडी येथीलअनिता सावंत, गोविंद म्हाडेश्वर, नकुल सावंत, शंकर सावंत, उत्तम सावंत अशा एकूण पाच रुग्णांना त्यांच्या औषधोपचारासाठी तसेच आकेरी…

Read More

मालवण कथामालेचा सेवामयी शिक्षक पुरस्कार श्रीम. देवयानी आजगावकर यांना जाहीर…

⚡मालवण ता.०९-: अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवणचा प्रतिवर्षी दिला जाणारा शिक्षणतज्ञ कै. जी.टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार २०२४ सावंतवाडी तालुक्यातील पेंडूर येथील जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा पेंढ-याचीवाडीच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका श्रीम. देवयानी आजगावकर यांना नुकताच जाहीर झाला आहे. रोख रक्कम पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे या पुरस्काराचे…

Read More

वायंगणी येथे रांगोळी व भावगीत गायन स्पर्धेचे आयोजन…

⚡मालवण ता.०९-: वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठ आणि ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी समर्थ मठाच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दि. २४ डिसेंबर रोजी शालेय मुलांसाठी माध्यमिक व उच्चमाध्यमिक अशा दोन गटात रांगोळी स्पर्धा व भावगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक स्पर्धकांनी १० डिसेंबर पर्यंत नाव नोंदणी करावी….

Read More

त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रमासाठी १७ रोजी सिंधुदुर्ग किल्ला बंद..

⚡मालवण ता.०९-: मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यातील त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रम रविवार दि. १७ डिसेंबर रोजी होणार आहे. गेली साडेतीनशे वर्षे ही त्रैवाषिक धार्मिक विधीची परंपरा सुरू आहे. यानिमित्त १७ रोजी सिंधुदुर्ग किल्ला बंद ठेवण्यात येणार आहे. याची पर्यटकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन शिवराजेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी सकपाळ यांनी केले आहे.

Read More

मालवणात १२ ते १६ डिसेंबर दरम्यान कोकण चित्रपट महोत्सव

देवबागमध्ये चित्रपट दिंडीने होणार शुभारंभ.. ⚡मालवण ता.०९-: सिंधुरत्न कलावंत मंच, पर्यटन व्यावसायिक महासंघ, तारकर्ली पर्यटन विकास संस्था, मालवण नगरपालिका यांच्या वतीने कोकण चित्रपट महोत्सवाचे आयोजन दि. ११ ते १६ डिसेंबर या कालावधीत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात आले असून या महोत्सवाचा मालवणातील उदघाटन कार्यक्रम देवबाग येथील मत्स्यगंधा थिएटर मध्ये दि. १२ रोजी होणार आहे. यानिमित्त…

Read More
You cannot copy content of this page