⚡सावंतवाडी ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्विन्स् इंग्लिश स्कुल सावंतवाडी च्या विदयार्थ्यांनी ‘रंगोत्सव सेलिब्रेशन नॅशनल लेवल आर्ट’ स्पर्धेमध्ये नेत्रदिपक यश संपादित केले.
रंगोत्सव सेलिब्रेशन तर्फे कलरिंग, कोलाज मेकिंग, स्केचिंग, हॅन्डरायटिंग, टॅटू मेकिंग, फोटोग्राफी, फिंगर अॅन्ड थम पेंटींग, ग्रिटींग कार्ड, कार्टून मेकिंग इ. स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये नर्सरी ते दहावी पर्यतचे ९० विदयार्थी इंटरनॅशनल लेवल आर्ट स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. यांमध्ये कलरिंग स्पर्धेत प्रायमरी २ (तिसरी ते चौथी) गटातून कु. ग्रिष्मा सातार्डेकर हिने प्रथम क्रमांक, सेकंडरी १ (इ. पाचवी ते सातवी) गटातून कु. प्रतीक देसाई तृतीय व प्रायमरी २ (तिसरी ते चौथी) गटातून कु. धनश्री मठकर व सेकंडरी २ (इ. ८ वी ते १०वी) कु. मोहीत सावंत यांनी चौथा क्रमांक आणि स्केचिंग स्पर्धेत ज्युनिअर कॉलेज (इ. ९वी ते १२वी) गटातून कु. आयुष वेंगुर्लेकर याने चौथा कमांक मिळवला तसेच ६ विदयार्थ्यांना आर्ट मेरीट अवॉर्ड, ४ विदयार्थ्यांना कॉन्सोलेशन प्राईडा, प्री-प्रायमरी मधील ५ विदयार्थ्यांना केजी गिफ्ट, ६५ विदयार्थ्यांना गोल्ड मेरीट अवॉर्ड तसेच १७ विदयार्थ्यांना ब्राँझ मेरीट अवॉर्ड मिळाले आहेत.
तसेच या उत्कृष्ट कामगिरी बद्दल प्रशालेला नॅशनल आयकॉन अवॉर्ड, ट्रस्टी श्रीमंत राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले यांना पिनॅकल अवॉर्ड, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगांवकर यांना लिडर ऑफ एक्सलन्स इन कल्चरल अॅक्टीव्हीटी अवॉर्ड, समन्वयक श्रीम. गौरी सावंत यांना कलारत्न अवॉर्ड मिळाला.
त्यांच्या या यशाबददल सि. जि. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रदधाराजे भोसले व संस्थेचे सदस्य, तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगांवकर, शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी व पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.