विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन..
कणकवली : प्रेमदया प्रतिष्ठान (रजि.) मुंबई श्री. स्वामी समर्थ मठ कळसुली हर्डी सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री. हनुमंत सावंत यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपोर्णिमा सोहळ्या निमित्त श्री स्वामी समर्थ मठ कळसुली हर्डी येथे विविध धार्मिक कार्यक्रम गुरुवार १० जुलै ( उद्या ) रोजी आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी ५.३० वाजता नित्यापूजा, सकाळी ७ते ८वाजता अभिषेक, सकाळी ९ वाजता सत्यदत्त पूजा, सकाळी ११.३० वाजता प्रवचन, दुपारी १२.३० वाजता नामस्मरण, दुपारी १ वाजता महाआरती नैवेद्य , तीर्थप्रसाद, दुपारी १.३०वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता ग्रंथवाचन, सायंकाळी ६ वाजता स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी ७.३०वाजता हरिपाठ, रात्रौ. ८३० वाजता महाआरती, रात्रौ ९ वाजता स्थानिक सुस्वर भजने आदी विविध कार्यक्रम होणार आहेत.
तरी स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अस आवाहन प्रेमदया प्रतिष्ठान (रजि.) मुंबई श्री. स्वामी समर्थ मठ कळसुली हर्डी सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री. हनुमंत सावंत यांनी केले आहे.