इनरव्हील क्लब ऑफ कुडाळचा १३ जुलैला पदग्रहण समारंभ…

अध्यक्षपदी सौ सानिका मदने, सचिवपदी सौ सई तेली:कै मेघा शिरसाट स्मृती पुरस्कार सौ. स्मिता संतोष शिरसाट यांना जाहीर..

कुडाळ : इनरव्हील क्लब ऑफ कुडाळच्या नूतन अध्यक्षपदी सौ सानिका मदने ,सचिवपदी सौ सई तेली, खजिनदारपदी सौ गीतांजली कांदळगावकर, आयएसओ पदी सौ मेघा भोगटे तर एडिटर पदी पीडीसी डाॅ सौ सायली प्रभू यांची निवड झाली आहे. महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे रविवारी १३ जुलैला सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या वार्षिक पदग्रहण समारंभात नवीन पदाधिकारी पदग्रहण करतील अशी माहिती नूतन अध्यक्ष सौ सानिका मदने यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी इनरव्हील क्लब ऑफ कुडाळच्या सदस्या कै मेघा शिरसाट यांचे स्मृतिप्रीत्यर्थ स्वकर्तृत्वावर स्वावलंबी बनलेल्या सौ स्मिता संतोष शिरसाट यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
इनरव्हील क्लब ऑफ कुडाळच्या वार्षिक पदग्रहण समारंभाविषयी माहिती देण्यासाठी आज हॉटेल स्पाईस कोकण येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी इनरव्हील क्लब कुडाळच्या नूतन अध्यक्ष सानिका मदने, एडिटर पीडीसी सायली प्रभू, शिल्पा बिले तसेच रोटरीचे मावळते अध्यक्ष डाॅ संजय केसरे, नूतन अध्यक्ष राजीव पवार, खजिनदार राकेश म्हाडदळकर, उपप्रांतपाल सचिन मदने, रवींद्र परब, दिनेश आजगावकरउपस्थित होते. यावेळी नूतन अध्यक्ष सानिका मदने यांनी माहिती देताना सांगितले, पदग्रहण समारंभ १३ जुलै रोजी सायं ४ वा महालक्ष्मी हाॅल कुडाळ येथे आयोजित करण्यात आला असून प्रमुख पाहुण्या इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरच्या माजी अध्यक्ष सौ मनिषा संकपाळ उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांनी २०२५-२६ या वर्षात इनरव्हील क्लब ऑफ कुडाळची नूतन कार्यकारिणी जाहीर केली. त्यानुसार अध्यक्ष- सौ सानिका मदने, सचिव – सौ सई तेली, खजिनदार सौ गीतांजली कांदळगावकर, आयएसओ सौ मेघा भोगटे, एडिटर पीडीसी डाॅ सौ सायली प्रभू, आयपीपी सौ संजना काणेकर,सीपीसी सौ पल्लवी बोभाटे, सीसीसीसी सौ शिल्पा बिले, इसी सदस्य सौ ऋतुजा परब, सौ मानसी जोशी, सौ चित्रा बोभाटे, सौ पदमा वेंगुर्लेकर, सौ राजश्री सावंत, सौ मनाली नाईक.
इनरव्हील क्लब ऑफ कुडाळच्या सदस्या कै मेघा शिरसाट यांचे स्मृतिप्रीत्यर्थ स्वकर्तृत्वावर स्वावलंबी बनलेल्या सौ स्मिता संतोष शिरसाट यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त एका महिलेचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. इनरव्हील सदस्यांच्या पाल्यांचाही शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. वार्षिक पदग्रहण समारंभात १५ शालेय गरजू विद्यार्थ्यांना इनरव्हील ब्रॅण्डच्या वह्या वाटप करण्यात येणार आहेत. कुडाळ मधील डाॅ शिल्पा पवार यांना इनरव्हील क्लब ऑफ कुडाळच्या नूतन सदस्यपदी पदग्रहण केले जाणार आहे.
वर्षभरात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे अध्यक्षा सौ सानिका मदने व एडिटर पीडीसी सौ सायली प्रभू यांनी सांगितले. यामध्ये कुमारवयीन मुलींसाठी एमएचएम कार्यक्रम, वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप,महिला कामगारांसाठी आरोग्य शिबीर, मुलींना सायकलवाटप, शिलाई मशिन्स वाटप, नशाबंदी उद्बोधन कार्यशाळा, इ-लर्निग कीटआदी उपक्रमांचा समावेश आहे.काही उपक्रम रोटरी क्लब ऑफ कुडाळ सोबत संयुक्तरित्या करण्याचा मानस अध्यक्षा सौ सानिका मदने यांनी व्यक्त केला. यावर्षातील इनरव्हीलची नवीन थीम स्टेपअप ॲन्ड लीड बाय एक्झाम्पल अशी आहे. डिस्ट्रिक्ट ३१७० च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ उत्कर्षा पाटील यांची निवड करण्यात आली असल्याचे एडिटर पीडीसी डाॅ सायली प्रभू यांनी सांगितले.

You cannot copy content of this page