⚡कुडाळ ता.०९-: नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी अशी ख्याती असलेल्या पणदूर गावची ग्रामदेवता ‘श्री देवी सातेरी मातेचा’ वार्षिक जत्रोत्सव उद्या, कार्तिक कृष्ण द्वादशी म्हणजेच रविवार दि. १० डिसेंबर २०२३ रोजी भक्तीमय वातावरणात साजरा होणार आहे.
यावेळी सकाळपासून ओटी भरणे, नवस पूर्ण करणे, त्यानंतर रात्रौ आजगावकर दशावतार मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे. भक्तांनी श्री देवी सातेरी मातेच्या दर्शनाचा लाभ घेऊन कृपाशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन दादा साईल यांनी ग्रामस्थांच्या वतीने आवाहन केले आहे.