वायंगणी येथे रांगोळी व भावगीत गायन स्पर्धेचे आयोजन…

⚡मालवण ता.०९-: वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठ आणि ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी समर्थ मठाच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दि. २४ डिसेंबर रोजी शालेय मुलांसाठी माध्यमिक व उच्चमाध्यमिक अशा दोन गटात रांगोळी स्पर्धा व भावगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

इच्छुक स्पर्धकांनी १० डिसेंबर पर्यंत नाव नोंदणी करावी. विजेत्यांना रोख रक्कम व चषक देऊन तसेच सहभागी स्पर्धकांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी या स्पर्धेमध्ये मालवण तालुक्यातील शाळांनी व महाविद्यालयांनी सहभाग घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी शिक्षक श्री. जाधव ९४२०७३८६२६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कारण्यात आले आहे.

You cannot copy content of this page