मालवण कथामालेचा सेवामयी शिक्षक पुरस्कार श्रीम. देवयानी आजगावकर यांना जाहीर…

⚡मालवण ता.०९-: अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवणचा प्रतिवर्षी दिला जाणारा शिक्षणतज्ञ कै. जी.टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार २०२४ सावंतवाडी तालुक्यातील पेंडूर येथील जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा पेंढ-याचीवाडीच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका श्रीम. देवयानी आजगावकर यांना नुकताच जाहीर झाला आहे. रोख रक्कम पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे

या पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी शिक्षणतज्ञ कै. जी. टी. गावकर कथानगरी बीडये विद्यामंदिर केंद्रशाळा आचरे नं. १ या ठिकाणी संपन्न होणार आहे

देवयानी त्रिंबक आजगावकर यांनी गेली ३५ वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये पू.प्रा. शाळा मुटाट पाळेकरवाडी ता. देवगड, मातोंड नाटेली ता. वेंगुर्ले, केंद्रशाळा मातोंड बांबर क्र. ५ ता. वेंगुर्ले, मळेवाड नं.५, धाकोरे नं. १ ता. सावंतवाडी, पेंढ-याची वाडी पेंडूर ता. वेंगुर्ले आदी शाळांमध्ये शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून शाळा समाजाकडे व समाज शाळेकडे येण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.
सध्याची शाळा पेंढ-याचीवाडी, पेंडूर येथे शैक्षणिक कार्याबरोबरच साने गुरुजी कथामालेचे विविध उपक्रम, शैक्षणिक मार्गदर्शन, शिक्षक, पालक व समाज यांच्यासाठी विविध उपक्रम राबवून शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. त्यांच्या ३५ वर्षाच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा विशेष गौरव म्हणून सदर पुरस्कारासाठी निवड समितीने त्यांची निवड केल्याची माहिती शिक्षणतज्ञ जी.टी. गावकर सेवामयी पुरस्कार निवड समिती अध्यक्ष सदानंद कांबळी यांनी दिली

देवयानी आजगावकर यांना सेवामयी शिक्षक पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल साने गुरुजी कथामाला मालवण अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page