Headlines

बांदा हद्दीत एलसीबीची धडक कारवाई.

गोवा बनावटीच्या दारूसह ११.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त: सावंतवाडीतील दोघे ताब्यात.. ⚡सावंतवाडी ता.२८-: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बांदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत ११ लाख ७३ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये गोवा बनावटीच्या दारूसह एका चारचाकी गाडीचा समावेश आहे. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर…

Read More

पल्स पोलिओ मोहिमेचा भाजप महिला आघाडीकडून आढावा

एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहू नये; सौ अन्वेषा आचरेकर यांचे आवाहन मालवण,दि प्रतिनिधी देशभरात राबविण्यात येत असलेल्या पल्स पोलिओ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरात भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीने मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती तथा भाजप मालवण शहराध्यक्षा सौ अन्वेषा आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखालीविविध पोलिओ लसीकरण केंद्रांना भेटी देत मोहिमेचा प्रत्यक्ष आढावा घेतला. आज मालवण…

Read More

“गड्या, तू एकटा नाहीस… आम्ही सारे तुझ्या सोबत आहोत !”

शेतकऱ्यांना न्याय नसेल तर जलसमाधीचाच निर्धार ; ३ जुलैच्या देवगड आंदोलनासाठी राजू शेट्टींचे भावनिक आवाहन देवगड | प्रतिनिधी कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाकडे राज्य व केंद्र सरकारने केलेल्या दुर्लक्षाचा तीव्र निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रतिकलम अवघी २२० रुपयांची नुकसानभरपाई देऊन शासनाने शेतकऱ्यांच्या…

Read More

अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी किशोर चिटणीस…

⚡सावंतवाडी, ता.२८-: अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग च्या अध्यक्ष पदी किशोर चिटणीस यांची नुकतीच निवड करण्यात आली.उपाध्यक्ष पदी डॉ. प्रसाद नावेँकर, सचिव पदी अण्णा म्हापसेकर, खजिनदार पदी जितेंद्र ऊर्फ जितू मोरजकर तर सहसचिव पदी राजू केळुसकर यांची निवड करण्यात आली. ओंकार तुळसुलकर यांनी जून 2019 मध्ये वैयक्तीक कारणांनी स्वच्छेने राजिनामा दिल्यावर रिक्त झालेल्या अध्यक्ष पदाची धुरा डॉ….

Read More

सिंधुदुर्गात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ…

२७ हजार ८०६ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब;:पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय प्रारंभ ⚡ओरोस ता २८-: देशाला पोलिओमुक्त दर्जा मिळाला असला तरी हा मान कायम राखण्यासाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला रविवारी (ता. २८) सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्साहात सुरुवात झाली. उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन…

Read More

दिलगिरीने अपमान धुतला जाणार नाही…

कारवाई आणि बदली झाल्याशिवाय आंदोलन मागे नाही’कणकवलीत कर्मचाऱ्यांच्या आत्मसन्मानासाठी लढा; राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा.. ⚡ओरोस ता २८-: कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी बीएलओ प्रशिक्षणादरम्यान कर्मचाऱ्यांविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली असली, तरी ती केवळ औपचारिकता असून त्यामुळे कर्मचाऱ्यांचा झालेला अपमान भरून निघणार नाही. संबंधित अधिकाऱ्याची तात्काळ बदली करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होत नाही,…

Read More

बांदा पीएचसीत ‘पल्स पोलिओ २०२६’ मोहिमेचा शुभारंभ

जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या उपस्थितीत उद्घाटन सावंतवाडी : बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २०२६’ चे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. दीप प्रज्वलनकरून सकाळी 8 वाजता पोलिओ डोस पाजून या मोहिमेस प्रारंभ झाला. या उद्घाटन कार्यक्रमास बांदा ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रियांका नाईक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या….

Read More

चिरे-रेती वाहतूक वादावर तोडगा काढणार..

निलेश राणेंचे आठ दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन.. ⚡सावंतवाडी ता.२८-: चिरे, रेती आणि खडी वाहतूक करणाऱ्या ट्रक व्यवसायिक व सिंधुदुर्गतील चिरेखाण व्यवसायिक यांच्यात नुकतेच काही मतभेद झाले होते. यामुळे दोन्ही ठिकाणी संघर्ष निर्माण होण्याची परिस्थिती असताना शिवसेना नेते, कुडाळ- मालवणचे आमदार निलेश राणे यांनी या प्रश्नावर आठ दिवसांच्या आत सर्व संबंधितांशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचे…

Read More

यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव…

सीबीएसई बोर्डातील यश व शैक्षणिक योगदानाची दखल.. ⚡सावंतवाडी ता.२८-: कॉम्प्लेक्स कोल्हापूरच्या वतीने संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, अतिग्रे येथे आयोजित ‘सीबीएसई टॉपर सत्कार सोहळा २०२६’ मध्ये यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. सीबीएसई दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल शाळेचा विद्यार्थी सहर्ष सतीश धुमाळे याचा गौरव करण्यात आला. तसेच शिक्षिका दीपिका रुपेश…

Read More

खासदार उदयनराजे भोसले महाराज व नगराध्यक्ष संदेश पारकर यांची सदिच्छा भेट…

⚡कणकवली ता.२८-: सातारा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार मा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांची कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध सामाजिक, विकासात्मक तसेच जनहिताच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील विकासकामे, स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित बाबी आणि भविष्यातील विविध उपक्रमांबाबत सकारात्मक संवाद झाला. यावेळी परस्पर सहकार्याची भावना व्यक्त करत विकासाला गती…

Read More
You cannot copy content of this page