३७० निवेदने सादर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सर्व प्रश्न सोडवू;आमदार प्रमोदजी जठार..
⚡सावंतवाडी ता.२४-: भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्र चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य नागरिक, भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या शासकीय कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेल्या कामांना गती देण्यासाठी तसेच त्यांच्या अडचणी व समस्या सोडवण्यासाठी ‘सेवा अभियान’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
मा. प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या सूचनेनुसार, भाजपा आमदार प्रमोदजी जठार व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी येथे या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांच्या विविध प्रश्नांना प्रशासकीय पातळीवर योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी या माध्यमातून महत्त्वपूर्ण पुढाकार घेण्यात आला.
या उपक्रमाच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण साहेबांचे विशेष कार्य अधिकारी संतोषजी साखरे यांनी सावंतवाडी येथे उपस्थित राहून नागरिक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची विविध शासकीय कामांसंदर्भातील निवेदने स्वीकारली. नागरिकांनी मांडलेल्या समस्या, प्रलंबित प्रकरणे तसेच विविध शासकीय कार्यालयांमध्ये अडकलेल्या कामांची सविस्तर माहिती जाणून घेतली.
ज्या प्रकरणांमध्ये तातडीने प्रशासकीय हस्तक्षेप आवश्यक आहे, अशा विषयांबाबत संबंधित शासकीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून नियमांच्या चौकटीत आवश्यक ती कार्यवाही करून कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी सूचना करण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांना आपल्या समस्या योग्य पातळीवर मांडण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
विशेष म्हणजे, केवळ स्थानिक पातळीवरील प्रश्नांपुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता शासनस्तरावर निर्णय आवश्यक असलेल्या प्रकरणांसाठीही प्रभावी पाठपुरावा करण्यात येणार आहे. अशा निवेदनांवर प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण साहेबांचे कव्हरिंग लेटर जोडून संबंधित मंत्री कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय तसेच आवश्यक त्या शासकीय विभागांकडे प्रस्ताव व निवेदने पाठविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
यामुळे नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रलंबित प्रश्नांना योग्य प्रशासकीय तसेच शासनस्तरीय व्यासपीठ मिळणार आहे.
भारतीय जनता पार्टी ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित संघटना नसून, सामान्य माणसाच्या अडचणीच्या काळात त्याच्या पाठीशी उभी राहणारी संघटना आहे, हा संदेश ‘सेवा अभियान’च्या माध्यमातून अधोरेखित होत आहे. नागरिकांच्या समस्या संबंधित शासकीय यंत्रणेकडे पोहोचवून त्यांचा सातत्याने पाठपुरावा करण्याची ही कार्यपद्धती निश्चितच कौतुकास्पद आहे.
‘सेवा अभियान’च्या माध्यमातून भाजपा संघटनेला प्रशासकीय बळ मिळत असून, नागरिकांच्या प्रश्नांना केवळ आश्वासन न देता त्यासाठी प्रत्यक्ष प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्याची नवी कार्यसंस्कृती निर्माण होत आहे.
सावंतवाडी येथे पार पडलेला हा उपक्रम नागरिक, भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसाठी निश्चितच दिलासादायक ठरणारा आहे. आज ३७० निवेदने प्राप्त झाली. यावेळी नागरिक व कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत, आपल्या प्रलंबित प्रश्नांसाठी थेट मार्गदर्शन व पाठपुरावा मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी आमदार प्रमोदजी जठार, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगांवकर, जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब, पालकमंत्री नितेशजी राणे यांचे स्विय्य सहाय्यक भोगटे, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जि. प. सदस्य संदीप गावडे, सावंतवाडी उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, उपसभापती गौरव मुळीक, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, जिल्हा बँक संचालक गजानन गावडे, महेश सारंग, रवी मडगांवकर, दोडामार्ग मंडल अध्यक्ष दिपक गवस, वेंगुर्ला मंडल अध्यक्ष पप्पू परब, सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, बांदा मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, आंबोली मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, सावंतवाडी महिला मंडल अध्यक्ष सौ. मोहिनी मडगांवकर, प्रदेश महिला प्रतिनिधी सौ. रश्मी लुडबे, भाजपा युवामोर्चा आंबोली मंडल अध्यक्ष विनेश तावडे, सावंतवाडी युवामोर्चा मंडल अध्यक्ष हितेन नाईक, जि. प. सदस्य नितीन राऊळ, मायकल डिसोजा, सौ. अपर्णा सातोसकर, नगरसेवक आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, नगरसेविका सौ. दिपाली भालेकर, सौ. सुकन्या टोपले, सौ. दुलारी रांगणेकर तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
