आड बंदर येथे सापडली दोन विशेष कातळचित्रे…
⚡देवगड ता.१६-: आतापर्यंत देवगड तालुक्यात शंभरहुन अधिक कातळचित्रे सापडली आहेत. पण देवगडच्या किनारपट्टी भागात व त्याहून देवगडच्या दक्षिणेकडील भागात आतापर्यंत कातळचित्रे सापडली नव्हती. कोकण इतिहास परिषद व देवगड इतिहास संशोधन मंडळ हे सातत्याने गेली काही वर्षे कातळचित्र शोध मोहीम राबवत आहे. काल दिनांक १५ मार्च रोजी मुणगे या गावातील आडबंदर येथील सड्यावर दोन मानवाकृती सापडल्या…
