भक्त प्रीतम हरमलकर, साईशकुमार केसरकर यांनी मूर्ती नेली मठात..
बांदा/प्रतिनिधी
गोवा ते कवीलकट्टा कुडाळ येथील ऐतीहासीक साईमंदीरात जाणाऱ्या साईच्या पालखीचे भक्तीमय वातावरणात बांद्यातील साईभक्त (कै.) बाप्पा केसरकर संस्थापीत साईमठात श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी साईच्या पादूका व साईची मुर्ती वाजत गाजत साईभक्त प्रितम हरमलकर व साईशकुमार केसरकर यांनी साईमठात नेली. व त्या ठिकाणी सर्व साईभक्तानी साईची आरती केली.
यावेळी भक्तगणाना तिर्थ प्रसाद देण्यात आला. तसेच साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या वतीने या पदयात्रेत सहभागी साईभक्ताचा मंडळाचे सल्लागार ज्ञानेश्वर केसरकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या पदयात्रेत ६२ साईभक्त सहभागी झाले होते. रात्रौ हि पालखी कवीलकट्टा येथील साईमंदीरात पोहचल्यावर साईची शेजारती व महाप्रसाद होईल.
यावेळी श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर, उपाध्यक्ष रविंद्र मालवणकर, खजिनदार राजेश कारेकर, विश्वस्त साईराज साळगावकर, प्रितम हरमलकर, रविंद्र हरमलकर, प्रितेश केसरकर, साईश कुमार केसरकर, सौ. दर्शना केसरकर, सौ. प्रिया केसरकर, सौ. श्रेया केसरकर, दत्तप्रसाद केसरकर, अक्षय मयेकर, मंगलदास साळगावकर, ज्ञानेश्वर येडवे, गिरीष महाजन, ज्ञानेश्वर केसकर, शमीका केसरकर, शरवी केसकर आदी उपस्थित होते.
फोटो :-
बांद्यातील साईभक्ताच्या वतीने साई पालखीचे स्वागत करताना श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाचे पदाधीकारी. (छायाचित्र – निलेश मोरजकर)
