टोपीवाला हायस्कुलमध्ये कथक प्रशिक्षण वर्ग सुरु होणार…

⚡मालवण ता.०९-: मालवण येथील अ.शि.दे. टोपीवाला हायस्कूलच्या ज्ञानमंदिरमधील अनंत संगीत शाला या दालनात अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचा कथक परीक्षा सर्टिफिकेट कोर्स प्रशिक्षण वर्ग दि. १० ऑगस्ट पासून सुरू करण्यात येत आहे. याबाबत कलाशिक्षक बी.जी.सामंत यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शक अनुजा गांधी यांच्या उपस्थितीत पालक सभा घेऊन माहिती देण्यात आली. या कार्यक्रमास टोपीवाला हायस्कुलचे मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू…

Read More

मालवण देऊळवाडा स्मशानभूमीचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी…

मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरातील देऊळवाडा स्मशानभूमीचे काम गेले अनेक महिने सुरू असल्याने मृतदेहांवर उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. उन्हाळ्यात सुरू असलेले काम पावसाळ्यातही पूर्ण न झाल्याने भर पावसात अंत्यसंस्कार करण्याची वेळ नागरिकांवर ठेकेदारामुळे आली आहे. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याबाबत ठाकरे शिवसेनेचे युवासेना उपशहर अधिकारी उमेश चव्हाण यांनी याबाबत नगरपालिका प्रशासनाचे…

Read More

भजनात भाव महत्त्वाचा…

अॅड. देवदत्त परूळेकर:वेंगुर्ला येथे जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धेचे उद्घाटन.. वेंगुर्ला प्रतिनिधी- भजन ही भक्ती आहे आणि भक्तीतून कला निर्माण होते. भावाशिवाय भजनाला किमत नाही. म्हणूनच भजनात भाव महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक अॅड. देवदत्त परूळेकर यांनी वेंगुर्ला येथील भजन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले. ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवा, संत साहित्याचे अभ्यासक देवदत्त परूळेकर, प्रसिद्ध गायीका अनघा…

Read More

कोकणची समृद्धी दिल्लीपर्यंत जावी यासाठी प्रयत्न…

खासदार नारायण राणे:रेल्वे स्थानक परिसर सुशोभीकरण कामाचे लोकार्पण सोहळा उत्साहात ⚡सावंतवाडी ता.०९-: कोकण म्हणजे समृद्धी ही संकल्पना दिल्लीपर्यंत जावी यासाठी प्रयत्न करा. जिल्ह्याच दरडोई उत्पन्न अडीच लाख कोटींपर्यंत मी घेऊन गेलो. यापुढे मंत्री रविंद्र चव्हाण ते चार लाख कोटींपर्यंत घेऊन जातील असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला. तर नरेंद्र मोदींच्या…

Read More

सिंधुदुर्गची ओळख बदलण्याची गरज …

पालकमंत्री रवींद्र चव्हाण:माझ्या मंत्रीपदाचा उपयोग सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी केला.. ⚡सावंतवाडी ता.०९-: बाहेरून येणारा पर्यटक इथे कसा थांबेल ? यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. सिंधुदुर्गच्या जवळ चिपी व मोपा अशी दोन विमानतळ आहेत. याचा फायदा घेण गरजेचं आहे‌. सिंधुदुर्गची ओळख बदलण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, खास.नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली निश्चितच हा जिल्हा…

Read More

पाडलोसमध्ये चालकाच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला…

साईडपट्टी खचल्याने झाला अपघात : संरक्षक भिंत उभारण्याची मागणी.. ⚡बांदा ता.०९-: मडुरा-पाडलोस-न्हावेली मार्गावरील केणीवाडा येथे समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना रस्त्याची साईडपट्टी सुमारे तीन फूट खोल खचली. मात्र, टेम्पो चालकाच्या प्रसंगावधनामुळे अनर्थ टळला. केवळ खडीकरण व डांबरीकरण करून सार्वजनिक बांधकाम विभाग धन्यता मानते. परंतु धोकादायक साईडपट्टीकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे असे अपघात घडत असल्याचे पाडलोस…

Read More

शिरगाव येथे आजारपणाला कंटाळून वृद्धाची गळफास लावून आत्महत्या…

देवगड/प्रतिनिधी शिरगांव साटमवाडी येथील पुंडलिक बाळकृष्ण शेटये (84) यांनी आपल्या राहत्या घराच्या माळ्याला इलेक्ट्रिक वायरने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी 6.45 वा. च्या सुमारास उघडकीस आली. घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुंडलिक शेटये हे गेली चार वर्षे कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर औषधोपचार सुरु…

Read More

हात जोडतो, पण गवा रेड्यांचा बंदोबस्त करा…

हुमरमळा शेतकऱ्याचे वन अधिकाऱ्यांना गाऱ्हाणे:अतुल बंगे यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांसोबत वन अधिकाऱ्यांची बैठक.. कुडाळ : हुमरमळा (वालावल) गावातील शेतकऱ्यांनी आज वन अधिकाऱ्यांना गवा रेड्यांच्या त्रासातून मुक्त करा असे गाऱ्हाणे घातले. गवा रेड्यांचा बंदोबस्त केला जाईल तसेच नुकसानभरपाई मिळण्यासाठी सुद्धा प्रयत्न करू अशी ग्वाही वन अधिकऱ्यानी वालावल-हुमरमळा येतेच झालेल्या बैठकीत दिली. शेतकऱ्यांना दिली. माजी पंचायत समिती सदस्य…

Read More

१२ पासून तिन्ही मतदार संघासाठी स्वतंत्र जनता दरबार…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण:प्रश्न निकाली लागेपर्यंत करणार पाठपुरावा.. ओरोस ता.०९-: जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सुटाव्यात तसेच त्यांचे मूलभूत प्रश्न निकाली निघावे यासाठी जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र जनता दरबार घेण्यात येणार आहे. १२ ते १४ या कालावधीत प्रत्येक मतदार संघासाठी पूर्ण एक दिवस हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी स्वतंत्र दहा टेबल मांडण्यात येणार आहेत. समस्या घेवून येणाऱ्या…

Read More

सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन नजीकच्या जमीन मालकांनी व्यवसाय उभारावेत…

रेल्वेस्टेशन सुशोभीकरण लोकार्पण प्रसंगी खा राणे यांचे आवाहन:पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळे रोजगाराची संधी निर्माण झाल्याचे केले कौतुक.. सिंधुदुर्गनगरी ता ९सिंधुदुर्ग जिल्हा निसर्गरम्य आहे. त्याला साजेसे असे सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाचे शुशोभिकरण झाले आहे. त्याची स्वच्छता राखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. तसेच येथील रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण करून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रोजगारासाठी संधी उपलब्ध करून दिली…

Read More
You cannot copy content of this page