रुपेश राऊळ : निलेश राणेंनी कितीही आरोप केला तरी जनता विश्वास ठेवणार नाही, वैभव नाईक यंदा हॅट्रिक मारणार..
⚡सावंतवाडी ता.०१-: माजी खासदार निलेश राणे यांनी काल केलेला वैभव नाईक यांच्यावर आरोपात काही तथ्य नसून कुठेतरी आपलं भांड लपून ठेवण्यासाठी एक प्रकारे तो केविलवाणा प्रयत्न आहे, असा टोला विधानसभा रुपेश राऊळ यांनी लगावला.
दरम्यान वैभव नाईक हे कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघामधून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. आजपर्यंत त्यांनी जनतेच्या मनात आदराचं स्थान निर्माण केलंय , त्यामुळे निलेश राणे यांनी कितीही आरोप केला तरी जनता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नसून जनता ही वैभव नाईक यांच्या सोबतच राहणार असून आमदार नाईक हे यंदाच्या निवडणुकीत हॅट्रिक साधणार आहेत असा विश्वास आहे श्री.राऊळ यांनी यावेळी व्यक्त केला.
