⚡सावंतवाडी ता.३०-: भारताची ओळख कृषी प्रधान देश अशी आहे. आपल्या देशाची लोकसंस्कृती कृषीच्या अवती भोवतीच राहिलेली आहे. इथल्या प्राचीन इतिहासाच्या खाणाखुणात, इथल्या सांस्कृतिक वैभवातही कृषी संस्कृती डोकावते.
शेती किंवा निगा न करता निसर्गत:च उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात.या मुख्यत्वेकरून जंगलात (रानात), शेतांच्या बांधावर, माळरानात येतात. निसर्गात लागवड न करता या वनस्पती येतात. त्यामुळे या वनस्पतींमध्ये खनिजे महत्त्वाची मूलद्रव्य व अत्यंत उपयोगी रसायने असे घटक आढळतात. यांत अनेक औषधी गुणधर्मही असतात त्या आवर्जून खाल्या जातात.
याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी प्रशालेच्या स.शिक्षिका सौ. प्रज्ञा मातोंडकर मॅडम प्रेरणेतून मळगाव ऐक्यवर्धक संघ, मुंबई संचलित मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव या प्रशालेत विद्यार्थी रानभाज्या प्रदर्शन व विक्री ठेवण्यात आली. या प्रदर्शनाचे उद्द्घाटन शाळा समिती चेअरमन मा. श्री. मनोहर राऊळ साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
सध्याच्या फास्ट फूड जगात मुलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अशा भाज्यांची ओळख मुलांना व्हावी तसेच मुलांनी या भाज्या जेवणात वापराव्या असे मत शाळा समिती चेअरमन श्री मनोहर राऊळ साहेब यांनी व्यक्त केले व संस्थेच्या वतीने प्रशालेचे शुभेच्छापर आभार मानले.
तसेच या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव मा.श्री आर. आर. राऊळ साहेब यांनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या व पूर्ण शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची कौतुक केले…
तसेच या प्रदर्शनला सर्व ग्रामस्थ मुख्याध्यापक श्री. फाले सर पर्यवेक्षक श्री. कदम सर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच विद्यार्थ्याचा सहभाग ही मोठ्या प्रमाणात होता.
