सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांची वेदशास्त्र संस्कृत पाठशाळेला भेट…
सावंतवाडी : ‘एका लग्नाची, पुढची गोष्ट’ या नाटकाच्या निमित्ताने नाट्यसृष्टीतील विक्रमादित्य, अखिल भारतीय नाट्यपरिषदेचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले सावंतवाडी मध्ये आले होते. प्रयोगात पूर्वी सावंतवाडीतील वेदशास्त्र संस्कृत पाठशाळेला त्यांनी भेट दिली. यावेळीत्यांचे स्वागत करण्यात आले. या अर्ध्यातासाच्या भेटी दरम्यान त्यांना वेदपाठशाळेची माहीती दिली. पाठशाळेतील वैदिक आणि याज्ञिक शिक्षणाची माहिती पाठशाळेचे गुरुजी वेदमूर्ती भूषण केळकर…
