७० वर्षांवरील नागरिकांना उपचारासाठी वर्षाला ५ लाखाचे टॉपअप…

वय वंदना योजना लागू:१३५६ रोगांवर होणार उपचार..

ओरोस ता ११
शासनाने आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत ७० वर्षावरील सर्व जेष्ठ नागरिकांना त्यांचे उत्पन्न विचारात न घेता आयुष्मान वय वंदना योजना लागू केली आहे. या अंतर्गत मोफत आरोग्य कव्हरेज प्रदान करण्याचा निर्णय घेतला असुन १ एप्रिल २०२५ पासून राज्यात त्याबाबतची अमंलबजावणी सुरु करण्यात आली आहे. एकत्रित योजनेच्या प्रतिवर्ष प्रतिकुटूंब ५ लाखा पर्यंतच्या मोफत उपचारा बरोबरच आयुष्मान वय वंदना योजनेच्या लाभार्थ्यांना अतिरिक्त ५ लाख रुपयांचे टॉप अप प्रदान करण्यात येणार आहे.
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना दिनांक २३ सप्टेंबर २०१८ पासून राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. योजने अंतर्गत केंद शासनाच्या निर्णयानुसार वेळोवेळी इतर लाभार्थी कुटूंबांचा समावेश करण्यात येऊन त्यांना आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत विनामुल्य वैद्यकीय लाभ प्रदान करण्यात येत आहे. त्यात आता भारत सरकारने ७० वर्षावरील सर्व जेष्ठ नागरिकांना त्यांचे उत्पन्न विचारात न घेता आयुष्मान वय वंदना योजने अंतर्गत मोफत आरोग्य कव्हरेज प्रदान करण्याचा निर्णय घेतला असुन १ एप्रिल २०२५ पासून राज्यात त्याबाबतची अमंलबजावणी सुरु करण्यात आली आहे.
आयुष्मान वय वंदना योजनेचे कार्ड मिळण्यासाठी आधार कार्डद्वारे लाभार्थ्यांची ई-केवायसी केली जाते. बी आय एस 2.0 प्रणालीमधील आयुष्मान वय वंदना या टॅबमध्ये जाऊन लाभार्थ्यांच्या आधार कार्डद्वारे पडताळणी करुन त्याची ई-केवायसी केली जाते. ऑपरेटर लॉगिनद्वारे क्षेत्रिय स्तरावरील आशा कर्मचारी, आपले सरकार सेवा केंद्राचे कर्मचारी तसेच स्वस्त धान्य दुकानचालक यांचेमार्फत आयुष्मान वय वंदना कार्ड निर्माणाचे काम चालु आहे. तसेच बेनिफिसीअरी पर्यायाद्वारे लाभार्थी स्वतः आपले कार्ड निर्माण करून घेऊ शकतात. ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड स्वयंम मंजूर होऊन ते क्षेत्रिय स्तरावरील कर्मचा-यांमार्फत लाभार्थ्यापर्यंत पोहोचवले जाते.

१३५६ उपचार पध्दतीवर मोफत उपचार
एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत समाविष्ट जेष्ठ नागरिकांना आयुष्मान वय वंदना योजनेचे स्वतंत्र आयुष्मान कार्ड वितरीत करण्यात येणार आहे. एकत्रित योजनेच्या प्रतिवर्ष प्रतिकुटूंब ५ लाखा पर्यंतच्या मोफत उपचारा बरोबरच आयुष्मान वय वंदना योजनेच्या ७० वर्षांवरील लाभार्थ्यांना अतिरिक्त ५ लाख रुपयांचे टॉप अप प्रदान करण्यात येणार आहे. योजने अंतर्गत अंगिकृत रुग्णालया मधून १३५६ उपचार पध्दतीवर मोफत उपचार अनुज्ञेय आहेत. जिल्हयातील ७० वर्ष व त्यावरील नागरीकांनी आयुष्मान वय वंदना योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासना मार्फत करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page