राजन कोरगावकर:रत्नागिरीच्या ‘त्या’ अपघातावर तीव्र प्रतिक्रिया..
कुडाळ : संघटना म्हणून मांडलेल्या भूमिकेकडे दुर्लक्ष केल्यामुळेच रत्नागिरी येथे सोमवारचा अपघात झाला. .विचार करा. बसने पेट घेतला असता तर केवढा मोठा अनर्थ घडला असता.अधिकाऱ्यांच्या हेकेखोरपणामुळे सर्व शिक्षकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडून गेले आहे . इतका प्रवास करून तणावपूर्ण वातावरणात कुणी प्रशिक्षण घेईल कां ? अधिकाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट झाली होती काय? दुसऱ्यांच्या मनाचा विचार करणार आहेत की नाही.? त्यामुळे डाएट बंद करावे अशीच आमची मागणी आहे त्यामुळे सन्माननीय . रेखावार साहेब, जेव्हा संघटना मत व्यक्त करते, ते कुणाचे वैयक्तिक मत नसून त्यांच्या समूहाचे मत असते. म्हणूनच लोकशाही शासन प्रणाली मध्ये काम करताना त्यांच्या मताचा आदर करा, असा सल्ला महा राज्य प्राथ. शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
प्रसिद्धी पत्रकात श्री. कोरगावकर पुढे म्हणतात, ज्यांचं काम त्यांनी करावे. अपवाद वगळता शिक्षणाधिकारी आणि डाएट यांच्यात कुणाचा कुणाला मेळ नसतो. मालकाला माहीतच नसते. कुणीही येतो. बांधलेले बैलाचे जोत हाकतो. अशी गत शिक्षकांची झाली आहे. राज्य स्तरापासून केंद्रापर्यंत RP चे काम शिक्षक करतात. मग हे अधिकारी हवेत कशाला? डाएटचे अधिव्याख्याता, जिल्हा, तालुका स्तरावरील अधिकारी, साधन व्यक्ती, केंद्रप्रमुख इतकी मोठी फळी उपलब्ध असताना शिक्षकांना कां वेठीस धरले जाते? शिक्षकांचा अध्यापनाचा वेळ कां वाया घालवला जातो ?
बहुतांश जिल्ह्याचे डाएट प्राचार्य मनमानी आणि हुकूमशाही पद्धतीने प्रशासकीय कामकाज करीत असून संघटनाच्या सूचनाची जाणीवपूर्वक पायमल्ली करीत असल्यासमुळे संघटना स्वातंत्र्यावर गदा येत आहे. लोकशाही शासन व्यवस्थेत संघटना करणे हा घटनात्मक अधिकार आहे. मात्र संघटनाच्या सूचनाकडे दुर्लक्ष करण्यात काही अधिकाऱ्यांना धन्यता वाटते.त्यामुळे आदेश, परिपत्रक काढताना अनेक चुका राहतात. मग मार्गदर्शन मागवीने, आदेश, परिपत्रक रद्द करणे असे प्रकार घडतात..
रत्नागिरी डाएट प्राचार्यांना सांगूनही साधी सहानुभूतीची मानसिकता दाखविली नाही. राजापूर पासून चिपळूण- मंडणगड पर्यंतचे अंतर डाएट प्राचार्यांना माहित नाही काय? स्वतःच्या अधिनस्त अधिकाऱ्यांना त्रास नको म्हणून केलेल्या नियोजनात शिक्षकांचा नाहक बळी जाणार होता.
कोल्हापूर,रत्नागिरी जिल्ह्यात सर्व संघटना एकत्र आल्या त्याच आम्ही स्वागत करतो. वरिष्ठ श्रेणी, निवडश्रेणी प्रशिक्षण दरम्याने अनेक अडचणी आल्या. शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजयजी कोंबे यांनी अनेक जिल्ह्यातून आलेल्या तक्रारी रेखावार साहेब तुमच्या निदर्शनास आणल्या. मात्र त्याकडे गंभीरतेने पाहिले गेले नाही. म्हणूनच असे प्रकार घडले आहेत
अधिनस्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी शासन,प्रशासनाची आहे. इतर संवर्गाला ते मिळत. मात्र शिक्षकांनी काय कुणाचं घोड मारलं आहे. ज्यामुळे त्यांना विकतच प्रशिक्षण घ्यावं लागत. कुणाच्या सुपीक डोक्यातून फक्त शिक्षकांकडून पैसे वसुल करण्याची कल्पना आली. प्रशिक्षण केंद्रावर सोई सुविधा पण नाहीत.शिक्षक उपस्थित राहून सुद्धा अधिकृत ऑनलाईन उपस्थित दिसत नाहीत. जेवणा पाण्याची सोय नाही.शिक्षकांना अपमानस्पद बोलण्याचे प्रकार घडले.फक्त वेठीस धरण्याचे प्रकार केले गेले. याचा अर्थ असा झाला की विकतच दुखणं लावून घ्यायच. आणि नुकसान करून घ्यायचं अधिकाऱ्यांच्या एकाधिकारशाही, आपले ते खरे करण्याच्या प्रवृत्ती बद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती निषेध व्यक्त करीत आहे.असे श्री. कोरगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.