Headlines

Global Maharashtra Breaking News

बांद्यात शालेय निबंध स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद…

⚡बांदा ता.२३-: (कै.) परशुराम नाईक व कै. लक्ष्मीबाई परशुराम नाईक यांच्या स्मरणार्थ अंकुश माजगावकर व कुटुंबियांनी येथील नट वाचनालयात पुरस्कृत केलेल्या शालेय निबंध स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २०२४ च्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले.यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस आर सावंत, उपाध्यक्ष नीलेश मोरजकर,…

Read More

हद्दपारीविरोधात न्यायालयात दाद मागणार…

अनंत पिळणकर व देवेंद्र पिळणकर यांच्यावर हद्दपारीची केलेली कारवाई ही राजकीय सुडातून:सुडभावनेच्या व दबावाच्या कारवायांमुळे विरोधी पक्ष दबणार नाहीत;जिल्हाध्यक्ष अमित सामंत.. कणकवली : कणकवली शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर व देवेंद्र पिळणकर यांच्यावरील हद्दपारीची केलेली कारवाई ही राजकीय सुडातून प्रेरीत असून सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षांना राजकीय दृष्ट्या संपविण्यासाठी असले उपद्व्याप प्रशासनाला हाताशी धरून…

Read More

रिया गावडे ठरल्या पैठणीच्या मानकरी…

पाडलोसमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम : गाव व्हाट्सअप ग्रुपचे आयोजन.. बांदा : प्रतिनिधीउखाणे घेताना शब्दांची जुळवाजुळव करताना महिलांची उडालेली घांदल… मैत्रिणी व पतीराजाकडे पाहून केलेले स्मित हास्य… समोरच्या गटाला हरविण्यासाठी केलेली धावपळ महिलांसह मुलामुलींनी विविध गाण्यांच्या तालावर धरलेला ठेका… अव्वल क्रमांक मिळविण्यासाठी सर्वांचे सुरू असलेले अटीतटीचे प्रयत्न अन् वेळप्रसंगी हसत-हसत हार पत्करून समोरच्या महिलेच्या विजयाचा साजरा केलेला…

Read More

भजन क्षेत्रातील महीलांची २४ रोजी कणकवलीत बैठक…

⚡ओरोस ता २३-: भजन क्षेत्राशी संबंधित महिलांसाठी २४ फेब्रुवारी रोजी कणकवली येथील भालचंद्र महाराज मठात सकाळी १० वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी सर्व महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन सिंधू रत्न भजन सुधारक मंडळ सिंधुदुर्गचे अध्यक्ष भालचंद्र केळुसकर यांनी केले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महिला भजनी बुवा आणि डबलबारी भजनी बुवा यांची तातडीची सभा सोमवारी…

Read More

संजू परब यांचा कोलगावात भाजप-ठाकरे सेनेल जोरदार धक्का…

असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेत केला प्रवेश:महेश सारंग यांच्यासह सेनेला धक्का.. ⚡सावंतवाडी ता.२३-: कोलगाव पंचायत समिती मधील भाजप व ठाकरे सेनेचे असंख्य पधिकारी, कार्यकर्ते यांनी आज शिवसेना संघटक, माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला‌. कोलगावात महेश सारंग यांच्यासह ठाकरे सेनेला हा जोरदार धक्का मानला जात आहे. आगामी स्थानिक निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर संजू परब यांनी…

Read More

श्री. देवी भराडी आईचे माजी आम. वैभव नाईक यांनी घेतले दर्शन…

⚡मालवण ता.२२-:लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारी व नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून आज कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांसमवेत श्री भराडी देवीचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर…

Read More

तारकर्ली च्या समुद्रात बुडून दोन युवकांचा मृत्यू…

⚡मालवण ता.२२-:समुद्रस्नानाचा आनंद लुटत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने लाटांच्या तडाख्यात सापडलेल्या पुणे हडपसर येथील रोहित बाळासाहेब कोळी (वय २१) आणि शुभम सुनील सोनावणे (वय २२) या दोन युवकांचा तारकर्ली च्या समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तर या दोघांना वाचविण्यास गेलेल्या ओंकार अशोक भोसले (वय २४) याला वाचविण्यात स्थानिक ग्रामस्थांना यश आले आहे….

Read More

केंद्रीय मंत्री मा. ना. नितीनजी गडकरी यांचे सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना पक्षाच्या वतीने स्वागत…

⚡सावंतवाडी ता.२२-: माजी आमदार तथा भाजप नेते कै. आप्पासाहेब गोगटे जन्मशताब्दी वर्षाचा समारोप प्रसंगी केंद्रीय मंत्री तथा भाजपा राष्ट्रीय नेते केंद्रीय रस्ते विकास व बांधकाम मंत्री मा. ना. नितीनजी गडकरी यांच्या देवगड जामसंडे येथील कार्यक्रमास प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री अशोक दळवी यांनी सदिच्छा भेट घेऊन स्वागत केले. त्यावेळी सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष श्री. राजन…

Read More

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्र व प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम…

घरकुलांचे काम वेळेत पूर्ण करा:पालकमंत्री नितेश राणें.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२२-: प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वपूर्ण योजना असून राज्य शासनही या योजनेला सर्वतोपरी सहकार्य करत आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मधून जिल्ह्यातील ९ हजार ९६७ घरकुल मंजूर झोलेले आहेत. मे महिन्यापर्यंत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ देण्यासाठी सुक्ष्म नियोजन करून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम पूर्ण…

Read More

उबाठा सेनेचे विभाग प्रमुख उल्हास परब शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात…

सावंतवाडी : मडुरा येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विभाग प्रमुख, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उल्हास परब यांच्या नेतृत्वात मडुरा व अन्य गावातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्रीनितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजपा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या संघटन पर्व कार्यक्रमात हा प्रवेशाचा कार्यक्रम झाला. उबाठा गटाचे पदाधिकारी पांडुरंग तळवणेकर, नारायण मयेकर, आत्माराम धुरी, भगवान…

Read More
You cannot copy content of this page