दिगवळे येथे नदीच्या पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू…
कणकवली: मुंबई येथून नातेवाईकाच्या विवाहासाठी कुडाळ तालुक्यातील भरणी येथे आलेल्या तरुणाचा आंघोळीसाठी गेला असताना दिगवळे गडनदीपात्रातील भाल कोंडीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. तो तरुण बुडाल्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला.मात्र, तो सापडला नव्हता. गुरुवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला.नरडवे येथील मूळ रहिवासी असलेला व…
