सावंतवाडी, मालवण न्यायालय इमारत होण्यासाठी ऍड संग्राम देसाई, ऍड परिमल नाईक यांचा पाठपुरावा….

मुंबईत पालकमंत्री राणे यांची घेतली भेट:सकारात्मक घडली चर्चा..

⚡सावंतवाडी ता.१७-: सावंतवाडी व मालवण न्यायालयीन इमारतीचा पाठपुरावा करण्यासाठी पालकमंत्री श्री. नितेश राणे यांची आज मुंबई येथे अँड. संग्राम देसाई सदस्य माजी अध्यक्ष BCMG) व अँड. परिमल नाईक जिल्हा अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटना यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली व सकारात्मक चर्चा केली.

मंत्री महोदयांनी संबंधित खात्याचे मंत्री,व मुख्यमंत्री यांची भेट घेऊन तातडीने समस्या सोडविण्याचे आश्वासन दिलं. त्याच बरोबर सिंधुदुर्ग नागरी येथे वकील भवन करिता भूखंड उपलब्ध करून देण्यासाठी त्वरित कारवाई होण्यासाठी जिल्हाधिकारी यांना आदेश दिले.

या वेळी अँड. संदीप निंबाळकर,अँड, शामराव सावंत,अँड.गोविंद बांदेकर, अँड. स्वरूप पई, अँड. गोवेकर, अँड. पाटकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page