Headlines

Global Maharashtra Breaking News

‘नारळ लढवणे’च्या स्पर्धेत मयंक राऊत बाजीगर…

नेरूरमध्ये रुपेश पावसकर व ‘रणझुंजार’ आयोजित स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद:साईराज मांजरेकर उपविजेता.. ⚡कुडाळ ता.३०-: रणझुंजार मित्र मंडळ, नेरूर आणि जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ‘नारळ लढवणे’ स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला ग्रामस्थ, नागरिक तसेच खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचे विजेतेपद मयंक राऊळ याने पटकावले तर साईराज मांजरेकर उपविजेता…

Read Full News

वाढदिवसानिमित्त दिलीप भालेकर यांच्याकडून दयासागर छात्रालयातील विद्यार्थ्यांना धान्य व खाऊ वाटप…

⚡बांदा,ता.३०-: भाजप सरचिटणीस तथा सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रोणापाल येथील दयासागर छात्रालयातील विद्यार्थ्यांसाठी धान्य व खाऊ वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसोबत केक कापून वाढदिवस साधेपणाने व सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला.यावेळी महिला व बालकल्याण सभापती दिपाली दिलीप भालेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, चराटा माजी सरपंच अमित परब, शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष अजय सावंत, रोणापाल…

Read Full News

अशोक नारकरांच्या सेवाभावी उपक्रमाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

कणकवलीत ५७ रक्तदात्यांनी केले रक्तदान; सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम.. ⚡कणकवली ता.३०-: वाढदिवस म्हटला की उत्सव, शुभेच्छा आणि आनंदाचा सोहळा डोळ्यांसमोर येतो. मात्र, आपल्या वाढदिवसाचा आनंद समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करण्याची प्रेरणादायी परंपरा वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाचे क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी श्री. अशोक नारकर यांनी जपली. त्यांच्या ५६व्या वाढदिवसानिमित्त अशोक नारकर मित्रपरिवार, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान शाखा कणकवली आणि उपजिल्हा रुग्णालय…

Read Full News

वागदेत स्थानिक बियाणे बँकेचा शुभारंभ…

शाश्वत शेतीसाठी अभिनव उपक्रम:पारंपरिक बियाण्यांच्या संवर्धनावर भर.. ⚡कणकवली ता.३०-: तालुक्यातील मुक्ताई संकुल, वागदे येथे मुक्ताई शेती संशोधन व विकास गटाच्या माध्यमातून स्थानिक बियाणे बँक या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला. स्थानिक व पारंपरिक बियाण्यांचे जतन, संवर्धन व पुनर्वापर व्हावा तसेच शेतकऱ्यांना दर्जेदार स्थानिक बियाणे उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे….

Read Full News

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘मॅरेथॉन रन २०२६’ उत्साहात…

आयडियल हायस्कूल ते बिडवडी हायस्कूलपर्यंत दीडशे विद्यार्थ्यांचा सहभाग.. ⚡कणकवली ता.३०-: ज्ञानदा शिक्षण संस्था आयडियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तसेच सावली जनसेवा शिक्षण संस्था, वरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून ‘मॅरेथॉन रन २०२६’चे आयोजन करण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये सुमारे दीडशे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आरोडे येथील आयडियल हायस्कूलपासून मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली. तेथून…

Read Full News

गणेशोत्सवासाठी एसटी बसस्थानके सज्ज…

स्वच्छतेवर विशेष भर:अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने बसस्थानकांची स्वच्छता;बसेसही चकाचक करण्याचे काम सुरू.. ⚡कणकवली ता.३०-: कोकणातील सर्वात मोठ्या आणि उत्साहाच्या सणांपैकी एक असलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होतात. या पार्श्वभूमीवर प्रवाशांना अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळावा, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाची बसस्थानके सज्ज होत आहेत. परिवहन मंत्री…

Read Full News

सिंधुदुर्गातील बसस्थानकांवर पोलीस मदत कक्ष सुरू करा

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कणकवलीसह जिल्ह्यातील प्रमुख बसस्थानकांवर पोलीस बंदोबस्ताची गरज कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख बसस्थानकांवर बंद असलेले पोलीस मदत कक्ष पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. जिल्ह्यातील बसस्थानकांवर दररोज मोठ्या संख्येने महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बसस्थानकांवर पोलीस मदत केंद्र अथवा पोलीस कक्ष कार्यरत…

Read Full News

ग्रामीण भागातून शिक्षण घेत डॉ. विठ्ठल शिंदे यांची इंग्रजी विषयातून पीएच.डी.ला गवसणी…

गोठोसच्या सुपुत्राचे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश.. ⚡सावंतवाडी ता.३०-:येथील गोठोस, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथील रहिवासी आणि सध्या कोल्हापूर येथील वरिष्ठ महाविद्यालयात तासिका तत्त्वावर प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. विठ्ठल गंगाराम शिंदे यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून इंग्रजी विषयातून पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून अविरत परिश्रम, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी मिळविलेले हे…

Read Full News

बांद्यात राजू खान मित्रमंडळातर्फे भव्य दहीहंडी

१ लाख ११ हजार १११ रुपयांची भव्य दहीहंडी; ८, ७ व ६ थरांच्या सलामीसाठी विशेष पारितोषिके बांदा/सकाळ वृत्तसेवाश्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त बांदा येथे राजू खान मित्रमंडळाच्यावतीने रविवार, ७ सप्टेंबर रोजी भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, कट्टा कॉर्नर येथे रविवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या या सोहळ्यात १ लाख…

Read Full News

कारखाली अडकलेल्या वासराला माणुसकीचा हात

अभिषेक गावडेंची संवेदनशीलता:१५ दिवसांच्या उपचारांनंतर वासरू पुन्हा उभे.. ⚡कुडाळ ता.३०-: कधी कधी माणुसकीची खरी ओळख शब्दांत नव्हे, तर एखाद्या असहाय जीवासाठी केलेल्या कृतीतून दिसून येते. कुडाळ शहरातील हिंदू कॉलनी परिसरात अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका गाईच्या वासरासाठी शिवसेना कुडाळ शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि माणुसकी याचाच प्रत्यय देणारी ठरली आहे.दिनांक १६…

Read Full News

You cannot copy content of this page