⚡बांदा,ता.३०-: भाजप सरचिटणीस तथा सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रोणापाल येथील दयासागर छात्रालयातील विद्यार्थ्यांसाठी धान्य व खाऊ वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसोबत केक कापून वाढदिवस साधेपणाने व सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला.
यावेळी महिला व बालकल्याण सभापती दिपाली दिलीप भालेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, चराटा माजी सरपंच अमित परब, शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष अजय सावंत, रोणापाल ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर नेमण, सुदीन गावडे, मानकरी व युवा उद्योजक, बाबन तुयेकर, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष, जीवबा वीर, व्यवस्थापक बांदा, विवेक गवस, माजी विद्यार्थी तसेच दयासागर छात्रालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी दिलीप भालेकर म्हणाले, “वाढदिवसानिमित्त दयासागर छात्रालयाला भेट दिल्यानंतर मन भरून आले. तळागाळातील, गरीब व गरजू तसेच आई-वडिलांचे छत्र नसलेल्या विद्यार्थ्यांना परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेणे शक्य होत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी हे छात्रालय मोठे कार्य करीत आहे. त्यांना आमच्याकडून खारीचा वाटा म्हणून धान्य व खाऊचे वाटप करण्यात आले.”
छात्रालयातील विद्यार्थ्यांचे राहणीमान, शिस्त, शिक्षण घेण्याची जिद्द आणि एकाग्रता पाहून समाधान वाटल्याचे भालेकर यांनी सांगितले. भविष्यात या विद्यार्थ्यांसाठी आणखी काही करता आले तर निश्चितपणे मदत करू, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच समाजासाठी काही करण्याची इच्छा असलेल्या दात्यांनी पुढे येऊन या विद्यार्थ्यांना मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
वाढदिवसानिमित्त दिलीप भालेकर यांच्याकडून दयासागर छात्रालयातील विद्यार्थ्यांना धान्य व खाऊ वाटप…
