सत्ताधाऱ्यांनी श्रेयाचे राजकारण न करता कामांची उत्तरे द्यावीत – तपस्वी मयेकर
मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील रस्त्यांवरील खड्ड्यावरून उबाठा शिवसेना आणि सत्ताधारी शिंदे शिवसेना यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असताना उबाठा शिवसेनेचे नगरसेवक तपस्वी मयेकर यांनीही सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. मालवण तालुक्यात माजी आमदार वैभव नाईक यांच्या कार्यकाळात रस्त्यांची कामे झाली, हे मान्य आहे. मात्र, ही कामे तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आगाऊ मंजूर…
