⚡बांदा ता.३१-: बांदा मराठा समाजाच्या अध्यक्षपदी परिमल सावंत यांची, तर सचिवपदी सीताराम गावडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी विनोद सावळ, सहसचिवपदी हेमंत सावंत-मोर्ये, तर खजिनदारपदी महादेव सावंत-मोर्ये यांची निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणीचा कार्यकाळ तीन वर्षांचा असून, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
बांदा विकास सोसायटीच्या सभागृहात बांदा मराठा समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा उपाध्यक्ष परिमल सावंत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. यावेळी व्यासपीठावर संस्थापक अध्यक्ष नीलेश मोरजकर, माजी अध्यक्ष राजाराम ऊर्फ बाळू सावंत, मुख्य प्रवर्तक गुरुनाथ सावंत, म गो सावंत, माजी उपाध्यक्ष आनंद गवस, सल्लागार दीपक सावंत, सदस्य रत्नाकर आगलावे, महिला मराठा समाजाच्या अध्यक्षा स्वाती सावंत आदी उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी मागील सभेचे इतिवृत्त सचिव आनंद वसकर यांनी वाचून दाखविले. मागील तीन वर्षांत समाजाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी सभेपुढे सादर केली. यानंतर समाजाच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. खजिनदार महेश सावंत-मोर्ये यांनी जमाखर्चाचे वाचन केले.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर परिमल सावंत म्हणाले, “बांदा मराठा समाजाच्या एकजुटीला अधिक बळ देणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असेल. युवकांना संघटित करून त्यांच्या कलागुणांना वाव देणारे विविध उपक्रम राबविण्यात येतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत तसेच समाजातील गरजू घटकांना आवश्यक ते सहकार्य करण्याला प्राधान्य दिले जाईल. समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांना सोबत घेऊन पारदर्शकपणे काम करू. बांदा मराठा समाजाची एकजूट हीच आपली ताकद असून, सर्वांच्या सहकार्याने समाजासाठी भरीव काम उभे करू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
नूतन कार्यकारिणीत सदस्य म्हणून निलेश मोरजकर, शामसुंदर चव्हाण, शामसुंदर धुरी, लव रेडकर, भूषण सावंत, वासुदेव भोगले यांची, तर महिला सदस्या म्हणून अवंती पंडित, ममता सावंत, माधवी गाड, लक्ष्मी सावंत-मोर्ये, राखी कळंगुटकर व रिना मोरजकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी निर्भीड पत्रकार पुरस्कारप्राप्त पत्रकार नीलेश मोरजकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत तसेच भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष विकी कदम यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सभेला मकरंद तोरसकर, विकी कदम, माजी खजिनदार राकेश परब, मिलिंद सावंत, लक्ष्मण पावसकर, लक्ष्मण सावंत, ज्ञानेश्वर सावंत, घनश्याम सावंत, राजेश सावंत, ऋषिकेश सावंत, हेमंत दाभोलकर, निलेश सावंत-पाटेकर, आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन आनंद वसकर यांनी केले. नूतन सचिव सीताराम गावडे यांनी आभार मानले.
फोटो:-
पासपोर्ट.
बांदा मराठा समाजाच्या अध्यक्षपदी परिमल सावंत यांची सर्वानुमते निवड…
