Headlines

साळगाव–माणगाव रस्त्याचे खड्डे गणेश चतुर्थीपूर्वी बुजवा…

अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन; योगेश धुरी यांचा इशारा..

⚡कुडाळ ता.३१-: साळगाव–माणगाव हा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत येणारा प्रमुख मार्ग असून झारा, साळगाव, माणगाव परिसरात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी व भाविकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होणार असल्याने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून सर्व खड्डे बुजवावेत, अशी मागणी पंचायत समिती सदस्य व युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी केली आहे.
साळगाव–माणगाव मार्ग हा परिसरातील सुमारे २५ ते २६ गावांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीपूर्वी रस्त्याची पाहणी करून खड्डे योग्य पद्धतीने बुजवावेत, अशी मागणी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, कुडाळ येथील कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
मागणीची तातडीने दखल घेऊन कार्यवाही न झाल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा योगेश धुरी यांनी दिला.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपविभागप्रमुख शैलेश विर्णोडकर, माणगाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुनीलजी सावंत, ग्रामपंचायत सदस्य संदीप सावंत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी विभागप्रमुख अजित करमळकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page