Headlines

वेंगुर्ला मठ मार्गावर धोकादायक दगडामुळे “जीवितहानीची” शक्यता….

वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी या मुख्य मार्गांनाजीक मठ येथे साईडपट्टीच्या कामासाठी
‘अगदी साईडपट्टीवर मुख्य रस्त्याला लागून ‘ दगड ओतण्यात आल्याने गंभीर अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत या गंभीर प्रकाराची शासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी वाहनधारकातून करण्यात आली आहे. वाहतुकीच्या दृष्टीने वेंगुर्लाहुन कुडाळ तसेच सावंतवाडी कडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. मागील आठवड्यात याच ठिकाणी वळणावर एस टी बस गटारात कलंडली होती. तसेच याच ( वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी ) मार्गावर मागील कालावधीत बरेच अपघात होऊन चार ते पाच युवकांचा बळी गेला आहे. परंतु मठ एरियात काम करताना वारंवार असे गलथान प्रकार होत असल्याने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी वाहनधारकांतून करण्यात आली आहे. संबंधित विभागाच्या या अक्षम्य “गलथान” कारभाराची वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे यांनी तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी वाहनधारकांतून करण्यात आली आहे आहे. स्पॉटवर अशा प्रकारच्या धोकादायक स्थितीमुळे जीवितहानी अथवा अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल व्यक्त करण्यात आला आहे. सुरुवातीपासून आज पर्यंत संबंधित ठेकेदाराने मठ कार्यक्षेत्रातील साईडपट्टीचे ‘चांगले काम’ केले असून मुख्य मार्ग असल्याने सदर काम वाहनधारकांच्या हिताच्या दृष्टीने करण्यात यावे, अशी मागणी आहे.

You cannot copy content of this page