⚡वेंगुर्ला ता.३१-: शिवसेना वेंगुर्ला आणि आसोली- फणसखोल शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आसोली गाव मर्यादित इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अभंग गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. युवासेना तालुकाप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल गावडे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा उत्कृष्ट नियोजन आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
स्पर्धेचा उद्घाटन कार्यक्रम सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या स्पर्धेत आसोली गावातील विविध शाळांमधील जवळपास ५२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभंगांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक सच्चिदानंद उर्फ संजू परब, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख बाळा दळवी, सावंतवाडी तालुकाप्रमुख दिनेश गावडे, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, पंचायत समिती सदस्य संकेत धुरी, आसोली उपसरपंच शीतल घाडी, ग्रामपंचायत सदस्या नेत्रा राणे, आसोली ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष उदय धुरी, शिवसेना विभागप्रमुख मितेश परब, सत्यवान साटेलकर, जोसोली गावच्या पोलीस पाटील पूजा गावडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच मुख्याध्यापक श्रीम.आवळे, श्रीम. शिरोडकर, श्रीम. रेडकर, श्री तांडेल तसेच उपशिक्षक उपस्थित होते. शिवसेना पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ आणि भजनप्रेमी नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या स्पर्धेत पहिल्या गटात प्रथम क्रमांक शौर्य गुरव (आसोली शाळा नं. १), द्वितीय क्रमांक आर्वी गावडे (जोसली शाळा), तृतीय क्रमांक अधिरा गावडे (जोसली शाळा), उत्तेजनार्थ शांताराम गावडे (जोसली शाळा), उत्तेजनार्थ आर्यन गावडे (जोसली शाळा) क्रमांक पटकावले. दुसऱ्या गटात प्रथम क्रमांक रुही आग्रे (फणसखोल शाळा), द्वितीय क्रमांक शुभ्रा गावडे, तृतीय क्रमांक सान्वी जाधव (आसोली शाळा नं. १), उत्तेजनार्थ रुद्रा गावडे, उत्तेजनार्थ ज्योती नाईक (आसोली शाळा नं. १) क्रमांक पटकावले. तिसऱ्या गटात प्रथम क्रमांक गजानन नाईक (आसोली हायस्कूल), द्वितीय क्रमांक न्हानु गावडे (आसोली हायस्कूल) तृतीय क्रमांक वेदिका गावडे (आसोली हायस्कूल), उत्तेजनार्थ वेदांत गावडे (आसोली हायस्कूल) उत्तेजनार्थ मंगेश धुरी (आसोली हायस्कूल) क्रमांक पटकावले.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून गावातील नामवंत भजनी बुवा व माजी उपसरपंच संजय गावडे, नामवंत पखवाज वादक अनय सावंत आणि गावातील पहिली संगीत विशारद तेजल गावडे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फणसखोल शाळेचे मुख्याध्यापक श्री. गावडे यांनी केले, तर सहशिक्षक श्री. आग्रे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. या अभंग गायन स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमधील संगीत व सांस्कृतिक कलेला व्यासपीठ उपलब्ध झाले असून, आयोजकांच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
आसोलीत अभंग गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; तब्बल ५२ विद्यार्थ्यांचा सहभाग…
