Headlines

श्रावणी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले कणकवलीतील स्वयंभू मंदिरात दर्शन

प्रत्यक्ष फिल्डवर गेल्याने नागरिकांच्या समस्या समजण्यास मदत – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

कणकवली : प्रशासनातील अधिकारी म्हणून प्रत्यक्ष फिल्डवर आल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि प्रश्न समजून घेण्यास अधिक मदत होते, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. श्रावणी सोमवारनिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सोमवारी कणकवली शहरातील श्री स्वयंभू मंदिराला भेट देत भगवान महादेवाचे दर्शन घेत विधिवत पूजा केली. यावेळी मंदिर परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत स्थानिक परिस्थितीची माहिती घेतली. प्रत्यक्ष गावात व शहरात भेट दिल्यामुळे प्रशासनापर्यंत पोहोचणाऱ्या प्रश्नांसोबतच स्थानिक पातळीवरील प्रत्यक्ष समस्या समजून घेण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. तसेच जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कणकवली शहरातील गणपती मंदिरालाही भेट देऊन पूजा-अर्चा केली. श्रावणी सोमवारच्या निमित्ताने धार्मिक वातावरणात त्यांनी दर्शन घेतले.

यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, जाणते सदानंद राणे, अंबाजी राणे, नगरसेवक राकेश राणे, नगरसेवक किशोर राणे, अभय राणे, नगरसेविका मेघा गांगण, माजी नगरसेवक विराज भोसले, बंडू गांगण, माजी चारुदत्त साटम, महेश सावंत, तुकाराम राणे, शैलेश राणे, औदुंबर राणे, सखाराम राणे, सहदेव बागवे, उद्योजक विशाल कामत, विजय राणे, प्रवीण पाटील, विनायक पिळणकर, अनिकेत देसाई, स्वप्निल राणे, प्रशांत साटम, दिगंबर पिळणकर, राकेश पिळणकर, मनोज राणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या मंदिरभेटीमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

You cannot copy content of this page