संजू परब यांनी घेतली सदिच्छा भेट; पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा..
सावंतवाडी, ता. ३१ : प्रसिद्ध मूर्तीकार विलास मांजरेकर यांना कलाक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘कोकण कलारत्न’ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले.
मांजरेकर यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून कोकणच्या सांस्कृतिक व कलात्मक परंपरेला वेगळी ओळख मिळवून दिली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करत संजू परब यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच भविष्यातही त्यांच्या हातून उत्तम कलाकृती घडाव्यात, यासाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी नगरसेवक गुरुदास मठकर उपस्थित होते.
