साईरा अपार्टमेंटमध्ये भला मोठा नाग; सर्पमित्राने शिताफीने पकडले
बांदा/प्रतिनिधीबांदा विकास सोसायटीसमोरील साईरा अपार्टमेंटमध्ये शुक्रवारी भला मोठा नाग शिरल्याने एकच खळबळ उडाली. गणेश चतुर्थीच्या खरेदीसाठी परिसरात ग्राहकांची मोठी वर्दळ असतानाच नाग आल्याने नागरिकांची व दुकानदारांची तारांबळ उडाली.साईरा अपार्टमेंटच्या तळमजल्यावर दुकानांची दाटीवाटी असून, याच परिसरात नाग शिरल्याचे निदर्शनास आले. नाग दिसताच नागरिकांनी तत्काळ सर्पमित्र राजा खान यांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी दाखल होत शिताफीने भल्या…
