Headlines

Global Maharashtra Breaking News

संजना परब यांनी खिंड लढवली…

संजू परबांचा दणदणीत विजय: धनशक्तीवर जनशक्ती भारी.. ⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडीत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या प्रभाग 7 मधील नगरसेवक पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजू उर्फ सच्चिदानंद परब यांनी भाजपचे उमेदवार उदय नाईक यांचा 481 मतांनी पराभव केला आहे. या प्रभागात संजू परब यांच्या पराभवासाठी भाजपकडून मोठे प्रयत्न करण्यात आले होते. परंतु संजू परब यांनी केलेल्या कामामुळे…

Read Full News

धुरळा.! कणकवली नगरपंचायत निवडणुकीत संदेश पारकर विजयी…

कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शहर विकास आघाडीने आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून, आघाडीचे प्रमुख उमेदवार संदेश पारकर यांनी नगराध्यक्षपदी शानदार विजय संपादन केला आहे. अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत पारकर यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत कणकवलीच्या नगराध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा आपल्या हाती घेतली आहे.निवडणुकीचा निकाल जाहीर होताच कणकवली शहरात शहर…

Read Full News

“सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा; युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले नगराध्यक्षपदी विजयी”…

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपने आपला झेंडा फडकावला आहे. नगराध्यक्षपदी भाजपच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले १ हजार ३६३ एवढं मताधिक्य घेत विजयी झाल्या. थेट नगराध्यक्षपदासाठी निवडून येत त्या चौथ्या महिला नगराध्यक्षा ठरल्या आहेत. तसेच २० सदस्य पदासाठी भाजपचे ११, शिवसेना ७, उबाठा शिवसेना १ व कॉग्रेसचा १ उमेदवार नगरसेवक म्हणून विजयी झाले. नगराध्यक्षपदासाठी 6 उमेदवार रिंगणात…

Read Full News

वर्षभरात हिसाब चुकता…

सावंतवाडी नगरपालिकेत भाजपाची ताकद सिद्ध:विशाल परब यांची राजकीय पुनरागमनातून निर्णायक भूमिका; रवींद्र चव्हाण विशाल परब यांचे किंग मेकरचे बॅनर झळकले.. ⚡सावंतवाडी, ता.२१-:सावंतवाडी नगरपालिकेच्या निकालातून भारतीय जनता पक्षाची स्थानिक पातळीवरील ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, युवा नेते विशाल परब यांनी या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावत वर्षभरापूर्वीच्या राजकीय संघर्षाचा हिशेब चुकता केल्याचे चित्र दिसून आले आहे.सुमारे…

Read Full News

मालवण नगरपालिकेवर शिंदे शिवसेनेचा भगवा; ममता वराडकर नगराध्यक्षपदी विजयी…

⚡मालवण ता.२१-: संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या मालवण नगर परिषद निवडणुकीत शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ ममता मनमोहन वराडकर यांनी आपले प्रतिस्पर्धी भाजपा उमेदवार सौ शिल्पा यतीन खोत यांचा सुमारे 1019 मताधिक्यानी पराभव केला आहे या निवडणुकीत शिंदे शिवसेनेला 10 जागा मिळाल्या असून भाजपला पाच जागा तर उभाठा शिवसेनेला चार जागा आणि एक अपक्ष…

Read Full News

वेंगुल्र्यात भाजपाचे निर्विवाद वर्चस्व…

भाजपाचे 20 पैकी 16 जागांवर यश, दिलीप गिरप पुन्हा नगराध्यक्ष.. ⚡वेंगुर्ला ता.२०-: वेंगुर्ला नरगपरिषदेच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्षासहीत 20 पैकी 16 जागांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. वेंगुल्र्यातील नागरिकांनी सलग दुस-यांदा भाजपावर वि·ाास दाखवित दिलीप गिरप यांना नगराध्यक्षपदी विराजमान केले. या निवडणुकीत मातब्बर सहा माजी नगरसेवकांना पराभवाचा धक्का बसला. उद्धवसेनेला तीन, शिंदेसेनेला केवळ…

Read Full News

उमेदवारांची धाकधूक वाढली…

चार नगरपालिकांची मतमोजणीला थोड्याच वेळात होणार सुरुवात:सावंतवाडीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.२१- :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड धाकधूक निर्माण झाली असून जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष विशेषतः सावंतवाडी नगरपालिकेच्या निकालाकडे लागले आहे. सावंतवाडीमध्ये कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असून मतमोजणी…

Read Full News

गावातील एकजूट आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी मंडळाने दाखवलेले सातत्य प्रेरणादायी…

विशाल परब:गावठाणवाडी कला क्रीडा महोत्सवाचा १२ वा वार्षिक सोहळा उत्साहात सुरुवात.. ⚡सावंतवाडी ता.२०-: ‘गावठाणवाडी कला क्रीडा व मित्रमंडळ’ यांच्या वतीने आयोजित गाव चव्हाटा महोत्सवाचे १२ वे वर्ष मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरे झाले. या महोत्सवाला भारतीय जनता पार्टीचे युवा नेते श्री. विशाल परब यांनी प्रमुख उपस्थिती लावून मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक केले.विशालजी परब यांचे आगमन होताच…

Read Full News

मतमोजणीसाठी प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज…

⚡वेंगुर्ला ता.२०-: वेंगुर्ला नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदांसाठी 2 डिसेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. याची मतमोजणी उद्या 21 डिसेंबर रोजी सकारळी 10 वाजल्यापासून वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयात होणार आहे. या मतमोजणीसाठी प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.दरम्यान, दहा प्रभागांसाठी 16 मतदान केंद्र ठेवण्यात आली होती. त्यामुळे चार फे-यांमध्ये मतमोजणी होणार आहे. पहिल्या फेरीमध्ये प्रभाग 1…

Read Full News

You cannot copy content of this page