चार नगरपालिकांची मतमोजणीला थोड्याच वेळात होणार सुरुवात:सावंतवाडीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष..
⚡सावंतवाडी ता.२१- :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड धाकधूक निर्माण झाली असून जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष विशेषतः सावंतवाडी नगरपालिकेच्या निकालाकडे लागले आहे.
सावंतवाडीमध्ये कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असून मतमोजणी केंद्राच्या परिसरात कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली आहे. शिंदे गटाची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित असल्याने निकालाबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
दरम्यान संपूर्ण सिंधुदुर्गवासीयांचे लक्ष सावंतवाडीच्या निकालाकडे लागून राहिले आहे. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीकडे सर्वांचे बारकाईने लक्ष असणार आहे.
