गावातील एकजूट आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी मंडळाने दाखवलेले सातत्य प्रेरणादायी…

विशाल परब:गावठाणवाडी कला क्रीडा महोत्सवाचा १२ वा वार्षिक सोहळा उत्साहात सुरुवात..

⚡सावंतवाडी ता.२०-: ‘गावठाणवाडी कला क्रीडा व मित्रमंडळ’ यांच्या वतीने आयोजित गाव चव्हाटा महोत्सवाचे १२ वे वर्ष मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरे झाले. या महोत्सवाला भारतीय जनता पार्टीचे युवा नेते श्री. विशाल परब यांनी प्रमुख उपस्थिती लावून मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक केले.विशालजी परब यांचे आगमन होताच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. त्यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण भागातील कला आणि क्रीडा गुणांना वाव देणाऱ्या अशा महोत्सवांचे महत्त्व अधोरेखित करताना, गावातील एकजूट आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी मंडळाने गेल्या १२ वर्षांपासून दाखवलेले सातत्य प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले.

या सोहळ्यात व्यासपीठावर राजकीय आणि सामाजिक मान्यवर उपस्थित होते. यात ओटवणे गावचे सरपंच दाजी गावकर, ग्रामपंचायत सदस्य महेश चव्हाण, ॲड. अनिल निवर्डेकर, युवा मोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, मंडळाचे अध्यक्ष उमेश गावकर यांचा समावेश होता. तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बुरण, बाळा गावकर, अमोल गावकर, मंगेश चिले यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.कार्यक्रमाच्या शेवटी बाळा गावकर यांनी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे आणि सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचे आभार मानले. पसायदानाने सोहळ्याची सांगता झाली.

You cannot copy content of this page