मतमोजणीसाठी प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज…

⚡वेंगुर्ला ता.२०-: वेंगुर्ला नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदांसाठी 2 डिसेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. याची मतमोजणी उद्या 21 डिसेंबर रोजी सकारळी 10 वाजल्यापासून वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयात होणार आहे. या मतमोजणीसाठी प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.
दरम्यान, दहा प्रभागांसाठी 16 मतदान केंद्र ठेवण्यात आली होती. त्यामुळे चार फे-यांमध्ये मतमोजणी होणार आहे. पहिल्या फेरीमध्ये प्रभाग 1 व 2 यांची मतमोजणी, दुस-या फेरीत प्रभाग 3 व 4, तिस-या फेरीत 5, 6 व 7 तर चौथ्या फेरीत प्रभाग 8, 9 व 10 यांचे निकाल जाहीर होतील. सर्वात शेवट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांनी दिली. साधारणत: दोन ते तीन तासात निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
मतमोजणी दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये व शांततेत ही मतमोजणी व्हावी यासाठी पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली 8 पोलिस अधिकारी, 65 पोलिस अंमलदार व 39 होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रात निवडणुक आयोगाचे ओळखपत्र असणा-यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्यासाठी वेगळी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर तब्बल 15 दिवसाने मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सर्वांचीच उत्कंठा शिगेला पोहचली आहे.s

You cannot copy content of this page