भाजपाचे 20 पैकी 16 जागांवर यश, दिलीप गिरप पुन्हा नगराध्यक्ष..
⚡वेंगुर्ला ता.२०-: वेंगुर्ला नरगपरिषदेच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्षासहीत 20 पैकी 16 जागांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. वेंगुल्र्यातील नागरिकांनी सलग दुस-यांदा भाजपावर वि·ाास दाखवित दिलीप गिरप यांना नगराध्यक्षपदी विराजमान केले. या निवडणुकीत मातब्बर सहा माजी नगरसेवकांना पराभवाचा धक्का बसला. उद्धवसेनेला तीन, शिंदेसेनेला केवळ जागेवर समाधान मानावे लागले. तर काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेने एक वेगळी रंगत आणली होती. त्यामुळे आमदार दिपक केसरकर यांना हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
वेंगुर्ला नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया घेण्यात आली होती. याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. दरम्यान, या निवडणुकीत विधाता सावंत, तुषार सापळे, महेश डिचोलकर, बुधाजी येरम, कृतिका कुबल, श्रेया मयेकर या माजी नगरसेवकांना दारूण पराभवाचा धक्का बसला. तर दिलीप गिरप यांना नगराध्यक्षपदाची सलग दुस-यांदा संधी मिळाली. त्यांनी माजी नगरसेवक शिंदेसेनेचे उमेदवार नागेश गावडे यांचा 430 मतांनी परभाव केला. तर काँग्रेसचे विलास गावडे तिस-या क्रमांकावर राहिले. माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, सुषमा प्रभूखानोलकर, शितल आंगचेकर, सुमन निकम, संदेश निकम यांना पुन्हा नगरसेवकपदी विराजमान केले आहे. तर लिना म्हापणकर, रविंद्र शिरसाट, गौरी माईणकर, प्रितम सावंत, गौरी मराठे, आकांक्षा परब, तातोबा पालयेकर, विनय नेरूरकर, रिया केरकर, सदानंद गिरप, काजल कुबल, सचिन शेटये, समिधा रेडकर, युवराज जाधव आणि प्रणव वायंगणकर या नविन चेह-यांना संधी दिली.
एकूणच सर्वच पक्षांनी वेंगुर्ला नगरपरिषद निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुक रणांगणात माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, दिपक केसरकर आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी प्रचार सभा घेत रंगत आणली होती. मात्र, नितेश राणे यांनी शहरात वारंवार आढावा घेत मार्गदर्शन करीत होते. या निवडणुकीत ख-या अर्थाने जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी आणि भाजपाचे वेंगुर्ला मंडल अध्यक्ष पपू परब हे भाजपाचे विजयाचे किंगमेकर ठरले.
मतमोजणीसाठी कडक पोलिस बंदोबस्त
निवडणुक मतमोजणीच्या आजच्या दिवशी पहिल्यांदाच एवढा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्वसामान्य नागरिकांना काही किलोमिटरच्या बाहेरच प्रतिक्षा करीत थांबावे लागले. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत होती.
गुलाल भाजपचाच
विजयानंतर भाजपाच्यावतीने गुलाल उधळून, लाडू वाटून, फटाक्यंची आतषबाजी आणि डिजेच्या तालावर जल्लोष करीत शहरात विजयी मिरवणूक काढण्यात आली.
फटाक्यांच्या आतषबाजीने माळरान पेटले
विजयाचा आनंदोत्सव साजरा करीत असताना माळरानावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या आतषबाजीने गवताने पेट घेतला. प्रसंगवधान राखत उपस्थितांनी लगेज आग विझविली. त्यानंतर अग्निशमनदलाला पाचारण करण्यात आले.
फोटोओळी – 1) विजयाचे किंगमेकर ठरलेले मनिष दळवी यांनी पदाधिकारी व कार्यकत्र्यांसहीत विजयी मिरवणूक काढत जल्लोष साजरा केला.
2) उमेदवार विजयी झाल्यानंतर गुलाल उधळण्यात आला.
3) सलग दुस-यांदा नगराध्यक्षनपदी विजयी झाल्यानंतर भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी दिलीप गिरप यांचे अभिनंदन केले.
4) विजयानंतर भाजपाने डिजेच्याही तालावर आनंदोत्सव केला.
(छाया – सावळाराम भराडकर)
