सावंतवाडी उभा बाजार येथीलसौ. अमिता दत्ता मसुरकर यांचे निधन…
⚡सावंतवाडी, ता. २६-:उभा बाजार, सावंतवाडी येथील रहिवासी सौ. अमिता दत्तप्रसाद मसुरकर (वय ५५) यांचे शुक्रवारी (दि. २६ डिसेंबर) सकाळी ६ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचे निधन बेळगाव येथील के. येली रुग्णालयात झाले.त्या सुवर्ण व्यवसायिक दत्तप्रसाद प्रभाकर मसुरकर यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती दत्तप्रसाद, मुलगा वेदांत, तसेच डॉक्टर दीक्षा मसुरकर असा परिवार आहे….
