⚡आंबोली,ता.१७-: येथील कामत वाडी येथील एका स्कूलचे उप प्राचार्य रवी पाटील यांच्या घरी चोरी झाली यात साधारण 30 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघड झाले आहे.आंबोली पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला. आंबोली कामतवाडी येथे रवींद्र पाटील यांचे घर आहे. ते एका स्कूल मध्ये ते उप प्राचार्य आहेत. ते गणेश चतुर्थी च्या सुट्टीत २३ तारीख ला कोल्हापूर येथे गावी गेले होते. काल ते आंबोली येथे घरी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे समजताच त्यांनी आंबोली पोलिसात तक्रार दिली. आज येथील हवालदार संतोष गणोले,लक्ष्मण काळे, गौरव परब,मनीष शिंदे,रामदास जाधव यांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला. ठसे तज्ञ,डॉग स्कॉड यांनीही याठिकाणी तपासणी केली. पुढील तपास सुरु आहे.
यामध्ये अर्धा तोळ्याचे मंगळसूत्र,चांदीच्या दोन देवाच्या मूर्ती,लहान मुलांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या, 2500 रुपये असा ऐवज चोरी झाला आहे.
