Headlines

Global Maharashtra Breaking News

भाजप कार्यकर्त्यांच्या वॉट्सअप स्टेट्सवर मी राणे समर्थक…

राणे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये उत्साही वातावरण:माजी मुख्यमंत्री खास. नारायण राणे यांचे उद्या जल्लोषी स्वागत.. ⚡कणकवली ता.०३-: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा कोकणचा बुलंद आवाज खासदार नारायण राणे नगरपरिषद निवडणूकानंतर पहिल्यांदाच उद्या रविवार दि. 4 जानेवारी 2026 रोजी सिंधुदुर्गात दाखल होत आहेत. त्यांच्या समवेत पालकमंत्री नितेश राणे, शिवसेना आ. निलेश राणे असे एकत्रित” राणे कुटुंबिय ” राजकीय घडामोडीनंतर…

Read Full News

सावित्रीबाई फुले यांचेआदर्श जोपासणे हे आपले कर्तव्य-: प्रज्ञा परब…

⚡वेंगुर्ला ता.०३-: ज्ञानज्योती –महिला शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी जी ज्ञानाची कवाडे खुली केली आहेत, त्यामुळे आज महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत.आई – वडिलांची शिकवण जोपासून आज आपण उद्योग क्षेत्रात कार्यरत आहे. आज महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहेच, पण आपल्या वेंगुर्ला या सुसंस्कृत शहरातील महिला भगिनी नगरपालिकेवर प्रतिनिधित्व करताहेत, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. महिलांनी…

Read Full News

श्रद्धा आणि संस्कृतीचे पाईक म्हणजेच वारकरी संप्रदाय-: प्रसन्ना देसाई…

⚡वेंगुर्ला ता.०३-: वेंगुर्ला तालुका समस्त वारकरी संप्रदाय कडून श्री देव रामेश्वर मंदिर वेंगुर्ला येथे भव्य वारकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २ जानेवारी ते दि. 4 जानेवारी पर्यंत तीन दिवस चालणाऱ्या या भव्य कीर्तन महोत्सवात स्वामी शिवानंद आश्रम शेकीन हासुर चे मठाधिपती ह.भ.प. वेदांतचार्य उदय पाटील (शास्त्री) , वासकर फड – पंढरपूर चे…

Read Full News

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी…

⚡कुडाळ ता.०३-: बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ येथे सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रतिमा पूजन प्राचार्या चैताली बांदेकर, प्रवीण शेवडे, अस्मिता मॅडम तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमात चित्रा कुंटे व अश्विनी परब यांनी मनोगत व्यक्त करत सावित्रीबाई फुले यांच्या…

Read Full News

विद्यार्थीदशेत शाळेने केलेले कौतुक ऊर्जा देणारी शिदोरी…

विठोबा सराफ:लक्ष्मी नारायण विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात.. ⚡कुडाळ ता.०३-: आपले आईवडील ज्या शाळेत शिकले त्याच शाळेत आपल्याला शिकायला मिळणे यासारखी दुसरी आनंददायी गोष्ट नाही. तोच आनंद उराशी बाळगून मन लावून शिका. प्रगती करा. तुमच्या पाठीवर तुमच्या शाळेची कौतुकाची थाप निश्चित पडेल. विद्यार्थीदशेत शाळेने केलेले कौतुक ऊर्जा देणारी शिदोरी असते, असे प्रतिपादन सराफ ॲग्रीकल्चर इंडिया…

Read Full News

खासदार नारायणराव राणेंच्या दौऱ्यानिमित्त बांदा–कणकवली भव्य बाइईक व वाहन रॅली..

⚡बांदा ता.०३-: भाजपा खासदार मा. नारायणराव राणे हे रविवार, दिनांक ४ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार असून, त्यांच्या आगमनानिमित्त बांदा येथे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर बांदा ते कणकवली अशी भव्य मोटारसायकल व वाहन रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती भाजपाच्या वतीने देण्यात आली आहे.या रॅलीसाठी बांदा मंडलातील सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी…

Read Full News

फोंडाघाट – हवेलीनगर २४ वर्षीय युवक बेपत्ता…

⚡कणकवली ता.०३-: फोंडाघाट – हवेलीनगर येथील करण गणेश वनारसे ( वय – २४ ) हा २ जानेवारी रोजी सायंकाळपासून बेपत्ता झाला आहे. याबाबतची खबर त्याचे वडील गणेश गंगाधर वनारसे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. करण याने शुक्रवारी सायं. ७.४५ वा. च्या सुमारास बाजारात जाऊन येतो असे सांगून घरातून बाहेर पडला. त्यावेळी करण आपली दुचाकी…

Read Full News

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

⚡कणकवली ता.०३-: राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे – रविवार ०४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता. सुवर्णगड, मुंबई येथून सांताक्रुझ विमानतळाकडे प्रयाण, सकाळी १०.०० वा. जनरल एव्हीएशन विमानतळ, सांताक्रूझ येथे आगमन व विमानाने मोपा, गोव्याकडे प्रयाण,…

Read Full News

कणकवली – नरडवे दुहेरी मार्ग बनला एकेरी…

कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर निम्म्या रस्त्यावर वाहने पार्किंग:नगरपंचायत प्रशासनाच्या सुचनांकडे केले जातेय दुर्लक्ष.. ⚡कणकवली ता.०३-:कणकवली – नरडवे नाका ते कणकवली रेल्वे स्टेशनपर्यंतचा दुहेरी रस्ता सध्या प्रत्यक्षात एकेरीसारखा वापरात असल्याचे चित्र दिसून येत आहे. या मार्गावर ठिकठिकाणी वाहने पार्क करून ठेवली जात असल्याने वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः या रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या…

Read Full News

शिवसेनेची ताकद तळागाळापर्यंत पोहोचवून सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क साधा…

संजू परब: आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न.. ⚡दोडामार्ग ता.०३-:दोडामार्ग तालुक्यातील कोलझर, मणेरी व माटणे पंचायत समिती क्षेत्रात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची महत्वपूर्ण संघटनात्मक आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख मा. श्री. संजू परब हे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद…

Read Full News

You cannot copy content of this page