खासदार नारायणराव राणेंच्या दौऱ्यानिमित्त बांदा–कणकवली भव्य बाइईक व वाहन रॅली..

⚡बांदा ता.०३-: भाजपा खासदार मा. नारायणराव राणे हे रविवार, दिनांक ४ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार असून, त्यांच्या आगमनानिमित्त बांदा येथे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर बांदा ते कणकवली अशी भव्य मोटारसायकल व वाहन रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती भाजपाच्या वतीने देण्यात आली आहे.
या रॅलीसाठी बांदा मंडलातील सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी दुपारी ३.०० वाजता बांदा येथे उपस्थित राहावे, असे आवाहन बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर यांनी केले आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काढण्यात येणारी ही रॅली महत्त्वाची मानली जात असून, मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. रॅलीदरम्यान शिस्त राखून, पक्षाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे

You cannot copy content of this page