फोंडाघाट – हवेलीनगर २४ वर्षीय युवक बेपत्ता…

⚡कणकवली ता.०३-: फोंडाघाट – हवेलीनगर येथील करण गणेश वनारसे ( वय – २४ ) हा २ जानेवारी रोजी सायंकाळपासून बेपत्ता झाला आहे. याबाबतची खबर त्याचे वडील गणेश गंगाधर वनारसे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे.

करण याने शुक्रवारी सायं. ७.४५ वा. च्या सुमारास बाजारात जाऊन येतो असे सांगून घरातून बाहेर पडला. त्यावेळी करण आपली दुचाकी घेऊन गेला होता. रात्री उशीरापर्यंत तो घरी न आल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध घतेला असता त्याची दुचाकी फोंडाघाट बाजारपेठेत मिळून आली. मात्र करण याचा काही शोध लागला नाही. त्यामुळे करण बेपत्ता असल्याची खबर कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. करण याने घरातून निघताना फिकट निळ्या रंगाचा शर्ट, काळी पॅन्ट घातली होती. तसेच त्याची उंची ५ फूट ६ इंच, रंग गव्हाळ, बांधा बारीक अशा वर्णनाची व्यक्ती दिसल्यास कणकवली पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page