Headlines

Global Maharashtra Breaking News

मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो अकादमीच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश…

ऋण्मय शिरवलकर, शास्वत गाठे यांनी रौप्य पदक तर प्रद्युम्न मुळदेकर याला कांस्यपदक.. ⚡कणकवली ता.१७-: तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) च्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग आणि सिंधू रत्न स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या वतीने ३५ वी राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा कुडाळ येथे घेण्यात आली. या स्पर्धेत मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो आणि फिटनेस अकादमी कणकवलीच्या…

Read Full News

भाजपच्या महापालिका यशाबद्दल मंत्री नितेश राणेंनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन…

⚡मुंबई दि.१७-: राज्यात मुंबईसह बहुतांश महानगरपालिकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. या यशानंतर राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. मुंबई महापालिकेत ठाकरे गटाची सत्ता खेचून भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता स्थापन झाल्याबद्दल मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष अभिनंदन केले….

Read Full News

अन्याया विरोधात लढण्यासाठी संघटित राहा…

सावळाराम अणावकर:सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन मेळावा संपन्न.. ⚡कुडाळ ता.१७-: अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी संघटनेशिवाय पर्याय नाही. आमच्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेने अन्याय व शिक्षकांच्या प्रश्नासाठी सातत्याने आवाज उठवून यश मिळवले आहे. हेच सातत्य टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने संघटित झाले पाहिजे. आपल्या संघटनेचे काम सर्व दूर पोहोचले पाहिजे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनचे…

Read Full News

सांगेली येथे १९ रोजी श्री पंचप्रभू मंदिराचा संप्रोक्षण विधी कार्यक्रम…

⚡सावंतवाडी ता.१७-: सांगेली येथील श्री पंचप्रभू मंदिराचा संप्रोक्षण विधी कार्यक्रम सोमवार दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.या दिवशी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कार्यक्रम पुढील प्रमाणे – सकाळी ८:०० मानकऱ्यांकडून सभार दान घेणे, स.८:१५ पुण्याहवाचन ,देवता स्थापन पूजन, अग्निस्थापन हवन,बलिदान,पूर्णाहुती, वास्तू स्थापना, दुपारी १:०० वाजता कलशारोहण,१:३० वा.आरती,तीर्थप्रसाद ,महाप्रसाद तसेच…

Read Full News

नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या इशाऱ्यानंतर मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे डांबरीकरण सुरू…

⚡सावंतवाडी ता.१७-: मुख्य बाजारपेठेत पाईपलाईनसाठी खोदलेला रस्ता डांबरीकरण करण्यास आज सकाळी प्रारंभ झाला. नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर नगरपरिषद बांधकाम विभाग खडबडून जागा झाला. सकाळपासून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. नळ पाण्याची लाईन बदलण्यासाठी शहरातील मुख्य बाजारपेठ रस्ते खोदण्यात आले होते. मात्र, काम पूर्णत्वास येऊन १० दिवस झाले तरी न.प. च्या बांधकाम…

Read Full News

वेताळ प्रतिष्ठानचा ‘अश्वमेध’ अखंड तेवत राहो…

सौ.वेदिका परब:अश्वमेध तुळस महोत्सव २०२६’ चा सोहळा उत्साहात संपन्न.. ⚡वेंगुर्ला ता.१६-: कोकणच्या सांस्कृतिक पटलावर आपल्या कार्यकर्तृत्वाचा स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अग्रणी संस्था ‘वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस’ आयोजित ‘अश्वमेध तुळस महोत्सव २०२६’ या पंचदश दिवसीय कलाविष्काराची सांगता नुकतीच अत्यंत दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाली. कला, क्रीडा आणि संस्कृतीचा अनुपम संगम असलेल्या या महोत्सवाचा सांगता…

Read Full News

भाजपा महायुतीच्या विजयाचा मालवणात जल्लोष…

मालवण भाजपा कार्यालयात आनंद साजरा.. मालवण ता.१६-: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत भाजपा महायुतीला मोठे यश प्राप्त झाले. या विजयाचा जल्लोष मालवण भाजपा कार्यालय येथे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय असो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजय असो,भाजपा जेष्ठ नेते खासदार नारायण राणे यांचा विजय असो, प्रदेशाध्यक्ष…

Read Full News

सावंतवाडीत अल्पवयीन विद्यार्थ्याची आत्महत्या…

सावंतवाडी ता.१६-: शहरातील जुनाबाजार कामत नगर येथे एका अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यान गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येमागच नेमक कारण समजू शकलेल नाही. सावंतवाडी पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत. मुळ नेमळे-फौजदारवाडी येथील हे कुटुंब शहरात राहत होतं. कामत नगर येथील इमारत रिडेव्हलपमेंटला काढल्याने ही इमारत बंद होती. आज त्याने या खोलीत जात आत्महत्या केली. मागील दरवाजाने…

Read Full News

अवैध दारू वाहतुकीवर इन्सुली येथे कारवाई…

२० लाखाचा मुद्देमाल जप्त:तीन चारचाकी वाहनावर कारवाई.. ⚡बांदा ता.१६-:राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली तपासणी नाका, येथे आज दिवसभरात करण्यात आलेल्या तीन स्वतंत्र कारवाईंमध्ये गोवा राज्यातून महाराष्ट्रात अवैधरित्या मद्याची वाहतूक करणाऱ्या तीन चारचाकी वाहनांवर कारवाई करत सुमारे २० लाख ५९ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मा. डॉ. राजेश देशमुख, मा. प्रसाद सूर्ये,…

Read Full News

दैवज्ञ गणपती मंदिराची नवी कार्यकारिणी जाहीर…

अध्यक्षपदी संतोष चोडणकर यांची निवड:तर सचिवपदी श्री. गौरव कारेकर तर खजिनदारपदी श्री. सुहास चिंदरकर यांची निवड.. ⚡सावंतवाडी, ता.१६-:दैवज्ञ गणपती मंदिर येथे शुक्रवार दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या वार्षिक सभेमध्ये एकमताने नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी श्री. संतोष वसंत चोडणकर, उपाध्यक्षपदी श्री. शिवशंकर नेरुरकर, सचिवपदी श्री. गौरव कारेकर तर खजिनदारपदी श्री. सुहास चिंदरकर…

Read Full News

You cannot copy content of this page