भाजपा महायुतीच्या विजयाचा मालवणात जल्लोष…

मालवण भाजपा कार्यालयात आनंद साजरा..

मालवण ता.१६-: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत भाजपा महायुतीला मोठे यश प्राप्त झाले. या विजयाचा जल्लोष मालवण भाजपा कार्यालय येथे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

भारतीय जनता पार्टीचा विजय असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय असो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजय असो,भाजपा जेष्ठ नेते खासदार नारायण राणे यांचा विजय असो, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विजय असो, पालकमंत्री नितेश राणे यांचा विजय असो अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

यावेळी भाजपा गटनेत्या नगरसेविका अन्वेशा आचरेकर, नगरसेवक मंदार केणी, ललित चव्हाण, रविकिरण तोरसकर, नगरसेविका दर्शना कासवकर, सौरभ ताम्हणकर, पंकज सादये, गौरव लुडबे, सेजल परब, अमृता फाटक, महिमा मयेकर, भाई कासवकर, आबा हडकर, संमेश परब, अवी सामंत, महेश मयेकर, कुणाल खानोलकर, मयेकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आगामी निवडणुकीत भाजपा महायुतीची विजयी दौड अशीच कायम राहील. असे नगरसेवक रविकिरण तोरसकर यांनी सांगितले.

फोटो : भाजपा महायुतीच्या विजयाचा मालवण भाजपा कार्यालयात आनंद साजरा करण्यात आला.

You cannot copy content of this page