सावंतवाडीत अल्पवयीन विद्यार्थ्याची आत्महत्या…

सावंतवाडी ता.१६-: शहरातील जुनाबाजार कामत नगर येथे एका अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यान गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येमागच नेमक कारण समजू शकलेल नाही. सावंतवाडी पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.

मुळ नेमळे-फौजदारवाडी येथील हे कुटुंब शहरात राहत होतं. कामत नगर येथील इमारत रिडेव्हलपमेंटला काढल्याने ही इमारत बंद होती. आज त्याने या खोलीत जात आत्महत्या केली. मागील दरवाजाने आत जात त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. सायंकाळपर्यंत घरी न परतल्यान घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. यावेळी कामत नगर येथील खोली बंद अवस्थेत दिसली. यावेळी खिडकी उघडून पाहिले असता त्याने गळफास घेतल्याचे उघडकीस आल्याची माहिती सावंतवाडी पोलिसांनी दिली. पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या उपस्थितीत पंचनामा करत मृतदेह पुढील सोपस्कारासाठी रूग्णालयात नेण्यात आला. हा विद्यार्थी शाळेत एकदम हुशार होता. तसेच क्रिडा क्षेत्रात देखील तो अग्रेसर होता. त्यामुळे त्याने आत्महत्येच टोकाचं पाऊल का उचलले ? हे समजू शकलेले नाही. पोलिस अधिक तपास करत आहे. त्याच्या या टोकाच्या पाऊलामुळे कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळा आहे.

You cannot copy content of this page