अवैध दारू वाहतुकीवर इन्सुली येथे कारवाई…

२० लाखाचा मुद्देमाल जप्त:तीन चारचाकी वाहनावर कारवाई..

⚡बांदा ता.१६-:
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली तपासणी नाका, येथे आज दिवसभरात करण्यात आलेल्या तीन स्वतंत्र कारवाईंमध्ये गोवा राज्यातून महाराष्ट्रात अवैधरित्या मद्याची वाहतूक करणाऱ्या तीन चारचाकी वाहनांवर कारवाई करत सुमारे २० लाख ५९ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई मा. डॉ. राजेश देशमुख, मा. प्रसाद सूर्ये, मा. विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

You cannot copy content of this page