Headlines

Global Maharashtra Breaking News

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष श्री मनीष दळवी यांनी आडेली येथे घेतले वारकरी बांधवांचे आशीर्वाद…

⚡वेंगुर्ला ता.२४-: वेंगुर्ला तालुक्यातील आडेली श्री देव सोमेश्वर मंदिर येथून पंढरपूर वारी साठी पंचक्रोशीतील वारकरी बांधव रवाना झाले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी वारकरी बांधवांचे आशीर्वाद घेऊन पंढरपूर वारीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी मनीष दळवी यांनी आडेली ग्रामदैवत श्री देव सोमेश्वराचे दर्शन घेतले.वारकरी बांधव बाबल गडेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून वारीचा शुभारंभ करण्यात आला….

Read Full News

सावंतवाडीत सालईवाडा परिसरात घडले हिट अँड रन ची घटना…

रवींद्र मंगल कार्यालयासमोर अज्ञात वाहनाची जोरदार धडक: सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध, संबंधित वाहन चालकाचा शोध घेऊन पोलिसांनी कारवाई करावी, संबंधित मालकाची मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२४-: येथील सालईवाडा परिसरातील रवींद्र मंगल कार्यालयासमोर काल रात्री उभ्या असलेल्या वाहनाला तसेच समोरील संरक्षण भिंतीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक देऊन पलायन केल्याची घटना घडली आहे. या अपघातात संबंधित वाहनमालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान…

Read Full News

प्रयाण टुरिझमच्या वतीने तिळगुळ समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.२३-:प्रयाण टुरिझम संस्थेच्या माध्यमातून तिळगुळ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संस्थेच्या विविध उपक्रमांबाबत उपस्थित महिलांना आयोजकांकडून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पुढील महिन्यात महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर तसेच केरळ येथे सहलीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या सहलीचा लाभ घ्यावा, तसेच इच्छुक महिलांनी लवकरात लवकर नाव…

Read Full News

वेंगुर्ला तालुक्यात शिवसेना – ठाकरे शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी…

⚡वेंगुर्ला ता.२३-: ठाकरे शिवसेनेच्या वतीने शिवसेना कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांची आज शुक्रवारी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी प्र. तालुकाप्रमुख निलेश चमणकर, शहरप्रमुख शैलेश परुळेकर, माजी जिल्हा परिषद सदस्या सुकन्या नरसुले, वायंगणी माजी सरपंच सुमन कामत,अभिमन्यू भुते,आनंद बटा, तुषार सापळे,अभिनव मांजरेकर, महिला तालुकाप्रमुख साक्षी चमणकर,सुजित चमणकर, विवेक कुबल, दिलीप राणे, गजानन गोलतकर, अक्षय पावसकर,सुहास मेस्त्री, दिपक केळूसकर,वाल्मिकी…

Read Full News

वेतोरे श्री देवी सातेरीचे दर्शन घेऊन आडेली जि. प., पं. स. महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡वेंगुर्ला ता.२३-: वेंगुर्ला तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ प्रसिद्ध वेतोरे ग्रामदेवता श्री देवी सातेरीचे दर्शन घेऊन करण्यात आला. आडेली जिल्हा परिषद सदस्य पदासाठी रिंगणात असलेले जिल्हा बँक अध्यक्ष मनीष प्रकाश दळवी व वायंगणी पंचायत समिती सदस्य पदासाठी रिंगणात असलेल्या शीतल राऊत या महायुतीच्या उमेदवारांनी श्री देवी सातेरीचे आशीर्वाद घेऊन प्रचारास आज…

Read Full News

फोंडाघाट जि. प. मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहीन…

महाविकास आघाडीचे फोंडाघाट जि. प. मतदार संघाचे उमेदवार अनंत पिळणकर यांची ग्वाही ‌ग्वाही.. ⚡कणकवली ता.२३-:फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघ गेली कित्येक वर्षे विकासाच्या प्रतीक्षेत आहे. अनेक ज्वलंत प्रश्न या मतदारसंघांमध्ये आहेत. त्याच सोडविण्यासाठी मी महाविकास आघाडीकडे उमेदवारी देण्याची मागणी केली. त्यानुसार मला उमेदवारी मिळाली असून निवडून आल्यानंतर फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघाच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध राहीन,…

Read Full News

कणकवलीतून चार उमेदवारांची माघार…

भाजपचा एक उमेदवार बिनविरोध.. ⚡कणकवली ता.२३-:जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यात शुक्रवारी चार उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे काही मतदारसंघांतील लढतीचे चित्र स्पष्ट होत असून एका मतदारसंघात भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातून शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार सुजाता हळदिवे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे….

Read Full News

देवगड महाविद्यायीन विदयार्थ्‍यांची मतदार जागृतीची रॅली…

⚡देवगड ता.२३-: राष्‍ट्रीय मतदार दिवस दरवर्षी २५ जानेवारी रोजी साजरा करण्‍यात येतो. यावर्षी रविवारची शासकिय सुट्टी असल्‍याने२३ जानेवारी, २०२६ रोजी सकाळी ०९.४५ वाजता, महाराष्ट्रातील देवगड येथील महाविद्यालय परिसरापासून कॉलेज रोडपर्यंत एक मतदार जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ७० स्वयंसेवकांनी सहभाग घेऊन निष्पक्ष आणि जास्तीत जास्त मतदानासाठी जनजागृती केली. कार्यक्रम अधिकारी डॉ. महेंद्र कामत…

Read Full News

तह‍सीलदार पवार यांच्‍या हस्‍ते नवमतदारांना ईपीक वाटप…

⚡देवगड ता.२३-: राष्‍ट्रीय मतदार दिवस दरवर्षी २५ जानेवारी रोजी साजरा करण्‍यात येतो. यावर्षी रविवारची शासकिय सुट्टी असल्‍याने२३ जानेवारी, २०२६ रोजी सकाळी तहसीलदार यांचेकार्यालयात राष्‍ट्रीय मतदार दिवसाचे औचित्‍य साधून मतदारांसाठीची शपथ ग्रहण करण्‍याचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला.सर्व कर्मचारी,अधिकारी यांनी मतदारांसाठीची शपथ ग्रहण केली.या कार्यक्रमाचे औचित्‍य साधून प्रदिप कदम यांनी राष्‍ट्रीय मतदार दिवासाचे महत्‍व विषद केले. तहसीलदार…

Read Full News

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांची बढती…

⚡सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ञ डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांना उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक (वर्ग एक) या पदावर बढती देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून हे पद रिक्त होते. अखेरीस राज्याचे आरोग्य मंत्री आबिटकर यांच्या मान्यतेने डॉ. ऐवळे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्तीसाठी पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार रवींद…

Read Full News

You cannot copy content of this page